आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसातून चार फेऱ्या:अकोला-अकोट दरम्यान आठ डब्यांची पॅसेंजर रेल्वेगाडी बुधवारपासून धावणार

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अकोट रेल्वे अखेर रूळावर येणार आहे. शनिवारी ट्रेनच्या वेळा जाहीर करण्यात आल्या होत्या. पण नागरिकांमध्ये तारखेबाबत उत्सुकता होती. रविवारी दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधक उपिंदर सिंह यांनी अकोला रेल्वे स्टेशनचा दौरा केला. या वेळी त्यांनी ही घोषणा केली. त्यानुसार बुधवारी २३ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता अकोला-अकोट पॅसेंजला हिरवी झेंडी दाखवण्यात येणार आहे.

अकोला-अकोट पॅसेंजर डिझेल गाडी आहे. ही आठ डब्याची गाडी असून, अकोट-अकोला प्रवास जवळपास दीड तासात पूर्ण करेल. तीस रूपये तिकीट दर अकोटसाठी आकारले जातील. परतीचेही दर सारखेच आहे. उगावा, गांधीग्राम रोड आणि पास्टुल तीन थांबे निश्चित केले आहेत.

याठिकाणी तिकीट काढण्याची व्यवस्था आहे. थांब्यावरील तीनही स्टेशनची पाहणी पूर्ण झाली आहे. प्रवाशांना आवश्यक सर्व सुविधा येथे उपलब्ध असतील. रविवारी डीआरएम उपिंदर सिंह आमदार रणधीर सावरकर व रेल्वे संघटनांसोबत चर्चा केली. सध्या जाहीर झालेल्या वेळेनुसार अकोला रेल्वे स्टेशवरून अकोटसाठी सकाळी ६.०० वाजता ट्रेन निघेल, सकाळी ७.२० मी. अकोटला पोहाेचेल. अकोटवरून सकाळी ८ वाजता गाडी सुटेल, अकोला रेल्वे स्टेशन येथे स. ९.२० वाजता पोहाेचेल.

रेल्वेमंत्री वैष्णव, दानवे, फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन
बुधवारी २३ तारखेला सकाळी १०.३० वाजता दिल्लीवरून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुंबईवरून उपमुख्यमंत्री,पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, गाडीला ऑनलाइन हिरवी झेंडी दाखवणार आहेत. या वेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरिष पिंपळे आदींसह रेल्वच्या अधिकाऱ्यांची या वेळी उपस्थिती राहील.

गाडीची वेळ बदलण्याची मागणी
या मार्गाचे काम चार वर्षापासून सुरू होते. अकोला-अकोट मार्गावरील गांधीग्रामच्या पुलाला तडा गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. यामुळे पालकमंत्री देवेंद फडणवीस यांनी प्रकरणाचा केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. यामुळे लोकांना मार्गावर ट्रेन उपलब्ध होत आहे. अकोल्यावरून पहिली फेरी ६ वाजता आहे. ही फेरी ७ वाजता सोडण्याची मागणी रेल्वेकडे केली आहे, अशी माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...