आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणुक:प्रभाग आरक्षण सोडतीवर एक हरकत

अकाेला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग आरक्षणाची सोडत काढली. दरम्यान १ ऑगस्ट रोजी एकही हरकत दाखल झाली नाही. मात्र मंगळवारी २ ऑगस्टला एक हरकत दाखल झाली. या हरकती चा िनपटारा करुन शुक्रवारी ५ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर केले जाणार आहे.

इतर मागासवर्गीयांना मनपा निवडणुकीत आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्या नंतर निवडणुक आयोगाने यापूर्वी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी जाहिर केलेले आरक्षण रद्द करुन इतर मागासवर्गीयासाठी २९ जुलैला येथील प्रमिलाताई ओक सभागृहात आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

यात ९१ पैकी २४ जागा इतर मागासवर्गीयांच्या जागा आरक्षित केल्या. यापैकी १२ जागा इतर मागासवर्गीय (महिला)साठी आरक्षित केल्या. ३० जुलैला प्रभाग आरक्षणाचे प्रारुप प्रसदि्ध केले. तर २ ऑगस्ट पर्यंत दुपारी तीन वाजे पर्यंत हरकती व सुचना मनपा कार्यालयातील निवडणुक विभागात लेखी स्वरुपात दाखल करता येणार होत्या. मंगळवारी २ ऑगस्ट रोजी एक हरकत प्राप्त झाली. या हरकतीचा निपटारा करुन ५ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग आरक्षण जाहिर केले जाणार आहे. त्यामुळे आता इच्छुकांमध्ये महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहिर होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...