आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या पासून रस्त्यावर अतिक्रमण हाटाव मोहीम:रविवारपर्यंत अतिक्रमण हटविण्याची दिली होती संधी

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य मार्गालगत लघु व्यावसायीकांनी केलेले अतिक्रमण त्यांचे नुकसान होवू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने लघु व्यावसायीकांना रविवार पर्यंत संधी दिली होती. मात्र रविवार पर्यंत चित्र जैसे-थे होते. परिणामी सोमवार पासून शहराच्या मुख्य रस्त्यावर धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे.

शहरातील प्रमुख रहदारी मार्गांवर अनेक ठिकाणी खासगी बसेस तसेच अन्य वाहने पार्क केलेली आढळतात. तसेच, गर्दीच्या मार्गांवर असलेल्या अतिक्रमित हॉकर्स व दुकानांमुळेही रहदारीत अडथळे निर्माण होतात. विशेषत: शहरातील मुख्य मार्गावर हे चित्र सातत्याने अनुभवास येते. यामुळे चोरीच्या घटना तसेच छेडखानीचे प्रकारही घडतात. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळेच रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.

शहरातील मुख्य मार्गावर झालेले अतिक्रमण काढण्याच्या सुचना या बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाला दिल्या होत्या. समितीत झालेल्या निर्णया नंतर महापालिका प्रशासनाने शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर ही मोहीम राबविल्या जाणार आहे. मात्र मोहीम सुरू करण्यापूर्वी रविवारपर्यंत अतिक्रमण धारकांनी स्वत: अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सोमवार पासून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

पुर्व झोन अंतर्गत दक्षता नगर चौक ते रेल्‍वे स्‍टेशन रोड, नेहरू पार्क चौक ते बिरला गेट, मुख्‍य पोस्‍ट ऑफिस ते सुधीर कॉलोनी पर्यंतचा रस्‍ता, उत्‍तर झोन अंतर्गत ओपन थिएटर ते माल धक्‍का, सिटी कोतवाली ते मंगला होटेल अकोट फैल पर्यंत, गांधी चौक ते ताजना पेठ पोलिस चौकी ते फतेह चौक, दक्षिण झोन अंतर्गत हुतात्मा चौक ते संत तुकाराम चौक पर्यंत, दक्षता नगर चौक ते कौलखेड चौक या मार्गावर मोहिम राबवली जाणार आहे. सोमवारी यापैकी कोणत्या मार्गावर ही मोहीम राबविली जाणार ही बाब आज स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...