आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद:लम्पी त्वचाराेगाचा प्रादुर्भाव; दुधाळ जनावरे वितरण याेजनेवर परिणाम

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण िवभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या दुधाळ जनावरांच्या वाटप याेजनेवर लम्पी त्वचा राेगाचा परिणाम झाला आहे. या राेगाच्या प्रादुर्भावामुळे या याेजनेअंतर्गत पात्र असलेल्या १९९ पैकी केवळ ७४ लाभार्थ्यांनाच लाभ िमळाला आहे. या याेजनेसाठी १ काेटी ७० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. राेगाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दुधाळ जनावरांच्या िवतरण प्रक्रियेला गती येणार आहे.

जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी वैयक्तिक लाभाच्या याेजना राबवण्यात येतात. ही याेजना ९० टक्के अनुदान तत्वावर राबवण्यात येते. लाभार्थ्यांनी त्यांचा िहस्सा जमा केल्यानंतर साहित्याची संपूर्ण रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.

यासारखीच समाज कल्याण िवभागातर्फे २०२१-२२साठी दुधाळ जनावरे वाटप याेजना तयार करण्यात आली. यासाठी ग्रामस्थांकडून अर्ज मागवण्यात आले. छाननीअंती १९९ अर्जदार पात्र ठरवण्यात आले. याेजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू असतानाच लम्पी त्वचा राेगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आिण याेजनेची गतीच मंदावली. परिणामी ७४ लाभार्थ्यांनाच लाभ मिळू शकला.

यांना मिळाली मदत
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात काही िदवसांपूर्वी जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक झाली हाेती. या बैठकीत सादर झालेल्या माहितीनुसार मृत्युमुखी पडलेल्या ९१३ जनावरांच्या पालकांना २ कोटी २६ लाख ३८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले हाेते.

अशी आहे याेजनेची स्थिती
दुधाळ जनावरांसाठी लाभार्थ्यास ८५ हजारांच्या अनुदानाची तरतूद आहे. त्यानुसार १९९ पात्र अर्जदार निवडले असून, ७४ लाभार्थ्यांना ६२ लाखांचे िवतरणही करण्यात आले. मात्र लम्पी त्वचा राेगामुळे जनावरांच्या िवतरण प्रक्रियेची गती मंदावली आहे.

लाभार्थी प्रतीक्षेत
जिल्ह्यात लम्पी आजाराने थैमान घातले असून, या आजारामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांना जोडव्यवसाय व शेतीकामात जनावरांची महत्वाची भूमिका असते. आधीच शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले असून, अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली हाेती.

त्यात जोडधंदा म्हणून शेतकरी बांधवांना त्यांच्याकडील जनावरांच्या माध्यमातून संसार चालवण्यासाठी थोडी मदत होत होती, मात्र या आजाराने शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे दुधाळ जनावरे वाटपाच्या याेजनेचा तरी लाभ िमळावा, अशी मागणी हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...