आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार शहरातील वाॅर्ड क्रमांक १२ येथील गजानन बोर्डे यांच्या स्वस्त धान्य दुकानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वस्तूचे वाटप करण्यास प्रारंभ केला. यावेळी तहसीलदार प्रदीप पवार, निरीक्षण अधिकारी चैताली यादव, पुरवठा निरीक्षक भावना दताळे, गोदाम व्यवस्थापक दीपक साळोकार, अ. का. संदीप गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील अंत्याेदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना एपीएल (केशरी) शेतकरी योजनेतील लाभार्थी असा एकूण ४१ हजार १८९ शिधापत्रिकाधारकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व गुढीपाडव्या निमित्ताने साखर, हरभरा डाळ, रवा व पामतेल प्रत्येकी १ किलो प्रमाणे देण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गुढीपाडवा किट प्रति शिधापत्रिका प्रणालीद्वारे प्रति संच १०० दराने संबंधित लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील १६३ स्वस्त धान्य दुकानातून या किटचे वितरण करण्यात येणार आहे. या वेळी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी संबंधित स्वस्त धान्य दुकानाचे लाभार्थी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.