आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणी जाहीर:जिल्हाध्यक्षपदी अनिसोद्दीन, शाहिद इक्बाल खान कार्याध्यक्ष

बार्शीटाकळी2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शीटाकळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना अकोला जिल्हा शिक्षक कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी बार्शीटाकळी इंद्राआवास येथील जी. प. शाळेचे मुख्याध्यापक अनीसोद्दीन कुतबोद्दीन, तर जिल्हाकार्य अध्यक्षपदी डॉ. शाहिद इक्बाल खान यांची तसेच जिल्हा सचिवपदी रइस अहेमद निसार अहेमद यांची एक मताने निवड करण्यात आली आहे.

यांच्यावर अकोला जिल्हा अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अकोला जिल्हा अध्यक्ष अनीसोद्दिन, कार्यअध्यक्ष शाहिद इक्बाल खान, सचिव राईस अहेमद, निसार अहेमद यांच्या निवडीबाबत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष इल्हाजुद्दीन फारुकी, अमरावती विभाग प्रमुख एहसन अहेमद, शेख चांद यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे. सदरपदी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक गुलाम फारूक, शिक्षक शब्बीर अहेमद, सखाउलह खान, अब्दुल रशीद, इम्रान अली, गुलाम अली, नावेद अंजुम, शकली अहेमद, नावेद खान, सय्यद सलीम, प्रकाश राठोड, राहुल्लह खान, मुक्तसिर खान, वकार खान, शाहिद इक्बाल, शैख नसिर, अब्दुल मुतलीब, जेठाभाई पटेल, तारीक शैख यांनी त्यांचे स्वागत केले आहे, अशी माहिती अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...