आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने सैन्य दलातील भरतीसाठी सुरु केलेल्या अग्निपथ योजनेला विरोध वाढतच असून, सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रेल्वे रोखून धरली. यावेळी आंदोंलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला. पोलिसांना आंदोलकांना नोटीसही बजावली आहे.
केंद्र सरकारने अग्निपथ अंतर्गत जाहीर केलेल्या अग्नविीर योजनेला अनेक राज्यात विरोध होत आहे. या योजनेनुसार इंडियन आर्मीत तरुणांना ४ वर्ष कामाची संधी मिळणार आहे. अग्निपथ योजनेनुसार दरवर्षी ४६ हजार युवकांची नविड करणार आहे. चार वर्ष संपताना त्यापैकी २५ टक्के युवकांना सैन्यदलात नोकरी मिळेल. इतर युवकांना चार वर्ष संपताना जवळपास ११ लाख रुपये मिळणार आहेत. दरम्यान या योजनेविरेाधात विद्यार्थी कॉंग्रेसनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उडी घेतली. २० जूनला गौतम नगर येथील रेल्वे रुळावर धाव घेत वाशीम-नांदेडकडे जाणारी हमसफर एक्स्प्रेस रोखून धरली. आंदोलकांनी केंद्र सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. ही योजना रद्द करण्याची मागणी करीत युवकांना न्याय देण्याचा आग्रही धरला. रायुकॉंच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलकांना तब्यात घेतले. याप्रकरणी खदान ठाण्यात गुन्हाही दाखल केला. आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या निर्देशानुसार आिण केले. आंदोलनात राकॉंचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. आंदोलनात रायुकॉंचे जिल्हाध्यक्ष शविा मोहोड, पंकज गावंडे, करण दोड, जयंत कडू, विशाल गावंडे, पिंटू वानखडे आदी सहभागी झाले. काळ्या फिती लावून राष्ट्रवादी युवकचे आंदोलन
केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांचे आदेशान्वये आमदार अमोल मिटकरी, महानगर अध्यक्ष वजिय देशमुख, प्रदेश संघटक मोहम्मद रफीक सिद्दिकी यांचे मार्गदर्शनात कार्यकर्त्यांनी गांधी-जवाहर बागेतील महात्मा गांधीच्या पुतळ्या समोर काळ्या फिती लावून आंदोलन केले. भाजपच्या केंद्र सरकारने भावी सैनिकांची भरती ही मानधन तत्वावर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भावी सैनिकांचा अपमान झाला आहे. या विरुद्ध देशात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. त्यामुळे केंद्र शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, यामागणी कडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ गांधी-जवाहर बागेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर काळ्या फिती तोंडावर बांधुन निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महानगर अध्यक्ष अजय मते, प्रदेश युवक कार्यकारिणी सदस्य बुढन गाडेकर, निरीक्षक अनंता काळे, शुभम पिठलोड, वैभव घुगे, आकाश धवसे, पृथ्वीराज गांवडे, मुंगेश इंगळे, गजानान मरुमकार, कैलास कराळे,बाळू ढोले, अजय कांबळे, संदीप कांबळे, अविनाश वाघुरवाघ, ताज नौरंगाबादी, अब्दुल नईम, आशिष वाधवानी, अब्दुल नाजिम आदि अनेक युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते. योजनाच रद्द करण्याची मागणी अनेक दविसांपासनू भरती थांबली अहे. याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करीत रायुकाँच्या कार्यक्रत्यांनी रुळावर धाव घेतली. २) केंद्र सराकराने घाईघाईने योजना तयार करून ती तरुणांवर लादली आहे, असाही आरोप आंदोलकांनी केला. हे नमूद केले आहे नोटीसमध्ये खदान पोलिसांनी रायुकॉंचे जिल्हाध्यक्ष शविा मोहोड यांना नोटीस बजावली. २० जूनला अग्निपथ योजनेविरुद्ध हमसफर एक्स्प्रेस थांबवण्यास भाग पाडले. त्यामुळे याप्रकरणी आपल्या विरुद्ध भादंविदचे कलम १४१, १४३, ३४१, १८८, रेल्वे अॅक्ट अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आपण न्यायालयात हजर राहावे, असेही नोटीसमध्ये नमूद केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. त्यात सहभागी झालेले पदाधिकारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.