आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:ज्युबिली इंग्लिश विद्यालयाचा वार्षिक उत्सव‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला एज्युकेशन सोसायटी द्वारे‎ संचलित रामदास पेठ येथील‎ ज्युबिली इंग्लिश हायस्कूल व‎ कनिष्ठ महाविद्यालयाचा //" फॅन्सी‎ ड्रिल //"हा वार्षिक उत्सव उत्साहात‎ पार पडला.‎ संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब‎ मांडवगणे यांच्या अध्यक्षतेत संपन्न‎ या सोहळ्याचे उदघाटक म्हणून‎ ज्युबिलीचे माजी विद्यार्थी डॉ. पार्थ‎ गवात्रे, संस्थेचे‎ अमरावतीकर,के.आर.जोशी , सौ.‎ रमणी जोशी, ज्युबिली इंग्लिश‎ हायस्कूल व कनिष्ठ‎ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. प्रज्ञा‎ पिंपळे आदी मान्यवर उपस्थित‎ होते.सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष‎ भाऊसाहेब मांडवगणे यांनी झेंडा‎ फडकवून व मशाल पेटवून‎ उत्सवाचा प्रारंभ केला. या‎ उत्सवात वर्ग ५ ते ९ च्या‎ विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेत‎ ही संकल्पना साकार केली.

यावेळी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांनी साकार‎ केलेल्या "आरंभ" ने कार्यक्रमाची‎ सुरवात झाली.या सोहळ्यात वर्ग‎ ५वी च्या विद्यार्थ्यांची " मोर‎ कवायत//" कार्यक्रमाचे आकर्षण‎ ठरली.तसेच वर्ग ६ वीची तितली व‎ कृष्णा यांची सुरेख कवायत, वर्ग ७‎ वी ची रॉकी व शिवतांडव‎ नृत्यकला, वर्ग ८ वीची दंगल व‎ पंजाबी थीम तसेच वर्ग ५ वीचे‎ धम्माल ब्राझील नृत्य तसेच वर्ग‎ ८,९ वी च्या विद्यार्थ्यांनी सादर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केलेल्या अंबाबाईच्या गोंधळ आदी‎ रंगारंग व नयनरम्य कलाविष्कारानी‎ उपस्थितांचे लक्ष वेधून‎ घेतले.यावेळी प्रा मांडवगणे यांनी‎ आपले विचार व्यक्त करीत‎ उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा‎ दिल्यात.कार्यक्रमाच्या या यशस्वी‎ नियोजनाबद्दल प्राचार्या,शिक्षकगण‎ व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक‎ करण्यात आले.यावेळी‎ विद्यार्थी,पालक, शिक्षकगण व‎ शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...