आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:वारी येथील मामा-भाचा डोहात बुडून एकाच आठवड्यात गेला दुसरा बळी

तेल्हारा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वारी येथील मामा-भाचा डोहाने एकाच आठवड्यात दुसरा बळी घेतला. या डोहात शनिवारी, ७ मे रोजी एका युवकाचा मृतदेह तरंगताना दिसला. हा युवक हिवरखेड रुपराव येथील इंदिरा नगरातील रहिवासी असून, त्याचे नाव प्रशांत सुधाकर पिसोळे आहे.

मृत युवकाचे वय अंदाजे तीस वर्ष आहे. पूर्वी ओळख न पटल्याने मृतकाच्या नावाबाबत बराच गोंधळ उडाला होता. मृत युवकाच्या अंगात लाल कपडे होते. वारीचे सरपंच शिवाजी पतींगे यांनी याची माहिती हिवरखेड पोलिसांना कळवली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतक युवकाची ओळख निष्पन्न केली. दोन, तीन दिवसांपूर्वीच अकोला येथील राज गुढधे नामक युवक सुद्धा याच डोहात बुडून मृत्यू पावला होता. आतापर्यंत अनेकांचा या डोहात बुडून मृत्यू झाले आहेत. परंतु डोह बुजवण्याबाबत यंत्रणेने झोपेचे सोंग घेतल्याचा आरोप या वेळी संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...