आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडाजंगी:अखर्चित नधिीवरून सत्ताधारी-विरोधक आक्रमक; प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​‘विकास कामांसाठीचा नधिी अखर्चित राहिल्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सोमवारी झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत आक्रमक झाले. दोन्ही बाजूने प्रशासनावर प्रश्नांची सरबत्तीच करण्यात आली. नधिी संबंधित सरकारी यंत्रणांकडे जि.प.कडून परत जाणे, नधिी शिल्लक राहणे, याला जबाबदार असलेल्या दोषींवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही सदस्यांनी केली. यावर यंदा नधिी विहित मुदतीत खर्च होईल,’ अशी ग्वाही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला विवधि विकास कामांसाठी नधिी देण्यात येतो. जि.प.ने प्रस्ताव डिपीसीला सादर केल्यानंतर नधिीचे वितरण होते. हा नधिी दोन वर्षात खर्च करणे अपेक्षित असते. मात्र यंदा २० कोटींपेक्षा जास्त नधिी अखर्चित राहिला असून, यावर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत वादळी चर्चा झाली. सत्ताधारी वंचित व विरोधक असलेल्या शवसिेना, काँग्रेस व अपक्ष सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर यंदा तातडीने नधिी खर्च होण्याची प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. सभेला अध्यक्षा प्रतिभा भोजने, उपाध्यक्षा सावित्री राठोड, सभापती स्फूर्ती गावंडे, सम्राट डोंगरदविे, आकाश सिरसाट, पंजाबराव वडाळ, सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे गट नेते ज्ञानेश्वर सुलताने, शवसिेनेचे गट नेते गोपाल दातकर, डॉ. प्रशांत अढाऊ, कांॅग्रेसचे चंद्रशेखर चिंचोळकर, गजानन पुंडकर, रायसिंग राठोड, सविता अढाऊ, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.

असे धरले धारेवर : १) बांधकाम विभागाचा किती नधिी अखर्चित राहिला, असा सवाल शिवसेनेचे गट नेते गोपाल दातकर यांनी केला. यावर कार्यकारी अभियंता रंभाडे म्हणाले कि, लेखाशिर्ष ३०५४ अंतर्गत सन २०२०-२१साठी ७ कोटी मिळाले होते. यातून २ कोटी ५३ लाख अखर्चित राहिले. अन्य एका लेखाशिर्षअंतर्गतही ७ कोटी मिळाले होते. यातून २ कोटी ८४ लाख खर्च झाले. हा नधिी रस्त्यांसाठी होता, असेही त्यांनी सांगितले.

२) नधिी अखर्चित का राहिला, असा प्रश्न दातकर यांनी केला. यावर काही रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअतंर्गत असणे, संबंधितांकडून दानपत्र न मिळणे, ग्राम पंचायतकडून दिरंगाई होणे आदी कारणांमुळे नधिी खर्च झाला नाही, असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. यावर एकच रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअतंर्गत होता; अन्य ठिकाणची कामे का झाली नाहीत, याला जबाबदार कोण असे सवाल दातकर यांनी केले.
३) शिकस्त शाळा वर्ग खोली दुरुस्ती, बांधकामाचीही कामे संध गतीने का सुरू आहेत, असा प्रश्न दातकर आिण सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ यांनी केला. यावर ७५ ठिकाणचे प्रस्ताव मंजूर होते, त्यापैकी ३९ कामे झाले असून, २९ ठिकाणची कामे प्रगतीपथवर असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. तसेच उर्वरित कामे जागेच्या अडचणींमुळे सुरू झालेली असेही ते म्हणाले.

अशी आहे कनिार : ‘वंचित’चे नेते सुलताने यांनी प्रशासनाला टोले लगावल्याच्या प्रकाराला २३ मार्चच्या सभेची कनिार आहे. या सभेत सत्ताधाऱ्यांनी दोन अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा ठराव घेतला होता. मात्र या ठरावाला विरोध करीत अधिकाऱ्यांनी सभेतून बहिर्गमन करीत केले होते. तसेच २३ अधिकाऱ्यांनी थेट आयुक्तांना पत्र पाठवून स्वत:च्या बदलीची मागणीच केली होती. त्यामुळे सुलताने यांनी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाला कोंडी पकडण्याची संधी सोडली नाही.

वंचित बहुजन आघाडीचे प्रशासनाला टोले
नधिी अर्खचित राहिल्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी वंचितचे गट नेते ज्ञानेश्वर सुलताने यांनी प्रशासनाला टोले लगावले. शिकस्त शाळा वर्ग खाेल्या पाडल्या नसतानाही प्रशासकीय मंजुरी का दिली, असा सवाल त्यांनी केला. नधिी खर्च न झाल्याने हे जि.प.चे पर्यायाने लाभार्थ्यांचे नुकसान झाले. काम अधिकाऱ्यांनी करायचे नाही आिण बदनामी मात्र पदाधिकारी-सदस्यांची होते. एककिडे कामे मार्गी लागण्याची प्रक्रिया वेळेत करायची नाही आिण त्यानंतरही आमच्यावर पदाधिकारी-सदस्यांकडून दबाव आणण्यात येतो, अशी आेरड करायची, अशा शब्दात सुलताने यांनी चिमटे काढले.

बातम्या आणखी आहेत...