आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला मनपाकडून मालमत्ता कर भरण्याचे आवाहन:थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्याने मालमत्ता केली सील

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाने गुरुवारी दि. 15 डिसेंबर रोजी पश्चिम झोनमधील थकीत कराचा भरणा न केल्याने मालमत्तेला सिल केले.

महापालिके समोर 100कोटी रुपयांपेक्षा अधिक थकीत मालमत्ता कर वसुल करण्याचे आव्हान आहे. थकीत करावर नियमाप्रमाणे महापालिकेला दरमहा दोन टक्के यानुसार व्याज आकारता येते. या व्याजाचा फटका नागरिकांना बसु नये, यासाठी महापालिकेने 2021-2022 या आर्थिक वर्षात अभय योजना राबवली. चालु आर्थिक वर्षातही जुन महिन्या पर्यंत ही योजना सुरु ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही योजना बंद करण्यात आला. मात्र विविध राजकीय पक्षानी अभय योजना राबविण्याचे आवाहन केल्या नंतर प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात (एक महिन्यापूरती) ही योजना राबवली. मात्र अद्यापही महापालिकेला कोट्यवधी रुपयाचा कर वसुल करावा लागणार आहे. या अनुषंगानेच आता थकीत मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याचे सुरु करण्यात आले आहे.

पश्चिम झोन क्षेत्रातील आश्रय नगर, डाबकी रोड वरील गट क्रं. बी-13, मालमत्‍ता क्रं. 2494 माधुरी वाईन बार यांचेकडे सन 2017-2018 ते सन 2022-23 पर्यंतचा एक लाख 35 हजार 691 रुपये मालमत्ता कर थकीत होता. थकीत कराचा भरणा करण्याबाबत वारंवार सुचना देवूनही थकीत कराचा भरणा न केल्याने मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाने अखेर मालमत्तेला सिल लावले. ही कारवाई मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये तसेच कर अधिक्षक विजय पारतवार आणि क्षेत्रीय अधिकारी दिलीप जाधव यांच्‍या मार्गदर्शनात सहा.कर अधिक्षक गजानन घोंगे, प्रवीण भालेराव, दिनेश देहलीवाले, प्रकाश मालगे आदींनी केली. दरम्यान शहरातील नागरिकांनी आपला थकित व चालू मालमत्‍ता कराचा भरणा वेळेवर करून सील, जप्‍ती लीलाव सारख्‍या अप्रीय कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...