आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड क्रमांक जोडणी करून घेण्याचे आवाहन

मूर्तिजापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रामाणिकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीची नाव नोंदणी ओळखण्यासाठी मतदार ओळखपत्र सोबत आधार क्रमांक लिंक केला जात आहे.

मतदार नोंदणी अधिकारी त्यांच्या मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित नमुन्यात आधार क्रमांक घरोघरी जाऊन व विशेष शिबिराद्वारे माहिती गोळा करण्यात येणार आहे. मतदारांना त्यांच्या आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज क्र.६ ब तयार करण्यात आलेला आहे. अर्ज क्र. ६ ब व भारत निवडणूक आयोगाच्या ecu.gov.in व मुख्य निवडणूक अधिकारी https://correction.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मतदारांना ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रमांक ६ ब माध्यमांवर देखील उपलब्ध राहणार आहे. तसेच अर्ज क्रमांक ६ ब च्या छापील प्रती देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्याची सुविधा पोर्टल, ॲपच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्याच्या दोन पद्धती असून त्यामध्ये स्वप्रामाणिककरणाच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल ॲपच्या माध्यमातून मतदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्रमांक ६ बी भरून आधार क्रमांक नोंदवू शकतील. तसेच स्व प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून त्यामध्ये दर्शवलेल्या ११ पर्यायी कागदपत्रांपैकी मनरेगा जॉब कार्ड, बँक पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून निगमित केलेले फोटो सहित पासबुक, आरोग्य विमा, स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआरअंतर्गत आरजीआय मार्फत वितरित केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र आणि राज्य शासन कर्मचाऱ्यांचे छायाचित्रासह ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र यापैकी एक दस्ताऐवज सादर करता येईल. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुक्यामध्ये आज रोजी एकूण २ लाख ९७ हजार ९६८९७ मतदार असून, त्यापैकी पुरुष मतदार १ लाख ५४ हजार ४६२ व स्त्री मतदार १ लाख ४३ हजार ५०१ आणि तृतीयपंथी मतदार ५ आहेत.

आधार कार्ड नोंदणी करीता मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून एकूण ३८१ मतदार केंद्र असून, या मतदान केंद्रावर एक मतदार नोंदणी अधिकारी कार्यान्वित आहे. तरी सर्व मतदारांनी मतदान कार्ड आधार कार्ड घेऊन मतदान केंद्रावर असलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे कडे आपले मतदार ओळखपत्र सोबत आधार जोडणी लिंक करून घ्यावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पवार यांनी केले आहे. मूर्तिजापूर येथे पाच व सहा या दोन दिवसात २८ हजार ४७६ मतदार ओळखपत्र सोबत आधार जोडणी करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार मोहन पांडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...