आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांमध्ये डाक तिकीट:शिष्यवृत्तीकरीता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज पाठवा

अकाेला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीनदयाल स्पर्श योजनेअंतर्गत डाक विभागाच्या वतीने इयता सहावी ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये डाक तिकीट संग्रहणाचे छंद, त्यांच्या योग्यता व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी फिलाटेली स्पर्धा घेतली जाते. महाराष्ट्र आणि गोवा पोस्टल सर्कलमधील ४० विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

या स्पर्धेमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन डाक विभागाच्या अधीक्षक यांनी केले आहे, अशी माहिती डाक विभागाच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...