आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:शिक्षणसंस्थेत अधिसंख्य पदावर नियुक्ती करा; जिल्हा कचेरीसमोर कर्मचाऱ्याचे धरणे आंदोलन

अकाेला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी एका कर्मचाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. कर्मचारी प्रकरण टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर तंत्र माध्यमिक विद्यालयातील आहे. मोठी उमरी परिसरातील टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर तंत्र माध्यमिक विद्यालयातील कर्मचारी विजय शिंदे व इतरांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून कमी करण्यात आले.

मात्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने संबंधितांना पुन्हा ११ महिन्यांसाठी शासकीय सेवेत तात्पुरत्या स्वरूपात अधिसंख्यपदी नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्यांना नियुक्तीचा आदेश प्राप्त झाला नाही. त्यामुळे विजय शिंदे यांच्यासह सहा जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...