आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तांतराचा परिणाम:अखेर डीपीसीवरील नियुक्त्या रद्द; शिंदे गट-भाजपमध्येच रस्सीखेच

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर जिल्हा नियाेजन समितीवरील (डीपीसी) नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारीची डीपीसीची सभा या सदस्यांवनिाच हाेणार आहे. यापूर्वी सदस्यांमध्ये तत्कालीन महाविकास आघाडीतील काँग्रेस, राकाँ व प्रहार जनशक्ति पार्टीच्या प्रत्येकी दाेन आणि शविसेनेच्या तीन जणांचा समावेश हाेता. आता नवीन सदस्य नियुक्तीसाठी भाजप व शिंदे गटात चढाआेढ हाेणार आहे.िजल्हा नियाेजन समितीच्या सभेत विकास कामांवर चर्चा करून निधीचे नियाेजन करण्यात येते.

समितीवर विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नविडणुकीत संधी न मिळल्यास कार्यकर्त्याचे डीपीसीवर अल्प प्रमाणात का हाेईना राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून हाेताे. सभेत विकास कामाचे प्रस्ताव लावून धरण्याची संधी मिळते.

दरम्यान राज्यात जून महनि्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर काही निर्णयांना स्थगिती, रद्दचा सपाटाच सुरू झाला आहे. आता डीपीसीवरील नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या आहेत.भाजप नेते हाेते विस्थापित : राजकीय साेयीसाठी राज्यातील सत्ताधारी डीपीसीवर आपल्या पक्षातील नेत्यांची वर्णी लावतात. मात्र नामनिर्देशित सदस्य म्हणून संसद सदस्यांमधूनही नविड करता येते. त्यामुळेच १४ जानेवारी २०२१ राेजी नियाेजन समितीने भाजपचे खा. संजय धाेत्रे यांचे नाव संसद सदस्यांमधून मंजुरीसाठी नियाेजन विभागाला पाठवले हाेते. मात्र १६ सप्टेंबरला जारी निर्णयामध्ये त्यांचे नाव नव्हते. आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विस्थापित झालेल्या भाजप नेत्यांना आता राजकीयदृष्ट्या अच्छे िदन आले आहेत.

दरम्यान राज्यात जून महनि्यात नवे शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर काही निर्णयांना स्थगिती, रद्दचा सपाटाच सुरू झाला आहे. आता डीपीसीवरील नियुक्त्याही रद्द करण्यात आल्या आहेत.स्पर्धा कमी : डीपीसीवर नियुक्त्यांसाठी भाजप व शिंदे गटातील अनेक जण उत्सुक आहेत. शिंदे गटात स्पर्धा कमी असली तरी भाजपमध्ये राजकीय महात्त्वाकांक्षा असलेल्यांची संख्या प्रचंड आहे. शिंदे गटात दाेन-तीन जणांना संधी िमळण्याची शक्यता आहे. उर्वरित सर्व जागांवर भाजपमध्येअंतर्गत रस्सीखेच हाेणार आहे.

या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या हाेत्या नियुक्त्या
डीपीसीवर विधानमंडळ व संसद सदस्यांमधून नामनिर्देशीत सदस्यांमध्ये शविसेनेचे आमदार नितीन देशमुख व विधान परिषद सदस्य अमाेल मिटकरी यांचा समावेश हाेता. विशेष निमंत्रित सदस्य म्हणून काँग्रेसचे डाॅ. पुरुषाेत्तम दातकर व महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी, राकाँचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे व महानगराध्यक्ष विजय देशमुख, प्रहारचे महासचवि राजेश खाराेडे, महानगराध्यक्ष मनाेज पाटील, शविसेनेचे उपजिल्हाप्रमुख गाेपाल दातकर,पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा व उमेश जाधव नियुक्ती झाली हाेती. आता नियुक्त्यांसाठी भाजप व शिंदे गटाचा विचार हाेणार आहे.

काय आहे आदेशात?
जिल्हा नियाेजन समिती व कार्यकारी समितीवरील नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंित्रत सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येत असल्याचा आदेश नियाेजन विभागाने जारी केला आहे. नवीन नियुक्त्यात प्रस्तावित आहेत. त्यामुळे डीपीसी व कार्यकारी समितीवरील नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंित्रत सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येत असून, याबाबतची माहिती सर्व संबंधितांना देण्यात यावी, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...