आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्यंत वर्दळीच्या रस्त्याच्या कामाला होणार सुरुवात:फतेह चौक ते दामले चौक मार्गाच्या डांबरीकरणाला मंजूरी; 1 कोटी रुपयांचा लागणार खर्च

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अत्यंत वर्दळीच्या फतेह चौक ते दामले चौक या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामास लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या स्थानिक विकास निधीतून यासाठी एक कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते जावेद झकेरीया यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने केली होती.

नागरिक होते त्रस्त

रेल्वे स्थानकातून शहरात येण्यासाठी खुले नाट्यगृह चौक ते मालधक्का चौक हा पर्यायी मार्ग आहे. खुलेनाट्यगृह चौक ते फतेह चौका पर्यंत कॉक्रीटीकरण झाललेे आहे. तर दामले चौक ते मालधक्का चौका पर्यंत डांबरीकरण झाललेे आहे. मात्र फतेह चौक ते दामले चौका पर्यंतच्या रस्त्याचे काम झालेले नव्हते. या रस्त्याची चाळणी झाली होती. या मार्गावरुन सतत जड वाहनांची ये-जा असते. रस्ता नादुरुस्त असल्याने जड वाहन गेल्या नंतर धुळीचे लोट उडतात. या प्रकारामुळे या मार्गावरील व्यावसायीक तसेच जाणारे - येणारे नागरिक त्रस्त झाले होते.

डांबरीकरणाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी

हा महत्वपूर्ण रस्ता अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात येतो. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जावेद झकेरीया यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने केली होती. या मागणीची दखल घेत, आमदार शर्मा यांनी या मार्गाच्या डांबरीकरणासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजुर केला होता. या दृष्टीने महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवली. तसेच या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आणि निधी वळता करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे येत्या दोन ते चार दिवसात या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास कंत्राटदाराला कामाचे आदेश दिल्या जाणार आहे. कामाचे आदेश दिल्या नंतर या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास प्रारंभ केला जाणार आहे.

अतिक्रमणामुळे रुंदी झाली कमी

फतेह चौक ते दीपक चौक (पेट्रोल पंप) पर्यंत रस्त्याची रुंदी 250 फुट आहे. मात्र या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्झायामुळे रस्ल्याता अरुंद झाला आहे. परिणामी रस्त्याचे डांबरीकरण केवळ 90 फुट (रुंदी) केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...