आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास कामे:दलितेतर वस्ती सुधार, नगरोत्थान निधीतील साडेएकोणीस कोटींच्या विविध कामांना मंजुरी

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून १२ कोटी आणि दलितेतर वस्ती सुधार योजनेतील ७ कोटी ५० लाख असे १९ कोटी ५० लाख रुपयांच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. नविदिा प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने या निधीतील विविध विकास कामांना लवकरच प्रारंभ होणार आहे.

सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत महापालिकेला ९ कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला. या योजनेत मिळालेल्या विकास निधीच्या रकमेच्या ३० टक्के रक्कम महापालिकेला वळती करावी लागते. त्यामुळे या योजनेत ३ कोटी रुपये महापालिकेला वळते करावे लागणार आहेत. त्यामुळे एकूण १२ कोटी रुपयांच्या या निधीतून शहराच्या विविध भागात १८ विकास कामे केली जाणार आहेत.

इच्छुकांना मिळणार दिलासा
येत्या काही महनि्यात महापालिका नविडणूक होणार आहे. त्यामुळे ज्या-ज्या प्रभागात विकास कामे घेण्यात आली आहेत. त्या भागातील नगरसेवकांना मोठा दिलासा मिळणार आहे तर काही भागात इच्छुकांना दिलासा मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...