आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअशोक वाटिका चौकात उड्डाणपुलाच्या लॅडींग (अॅब्युटमेन्ट) खाली फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्ती करता येत नसल्याने 30 मिटर लांब जलवाहिनी अंथरण्याच्या कामास महापालिकेने प्रारंभ केला आहे. या कामात अनेक तांत्रिक अडचणी असल्याने या कामास पाच दिवस लागण्याची शक्यता आहे.
अशोक वाटिका चौकात लॅडींग खालून गेलेली 600 मिली मिटर व्यासाची जलवाहिनी 19डिसेंबर रोजी फुटल्याने लॅडींग मधील राखेचा भराव बाहेर आला. परिणामी मुर्तिजापूरकडे जाणारी लॅडींग वरील वाहतुक बंद करावी लागली. तर शहरातील आठ जलकुंभाचा पाणी पुरवठाही ठप्प झाला आहे. लॅडीग खाली जलवाहिनी फुटल्याने दुरुस्ती काम करता येणार नसल्याने महापालिकेने लॅडींगच्या दुरुन जलवाहिनी वळवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 30 मिटर लांबीची 600 मिली मिटर व्यासाची जलवाहिनी अंथरण्यात येत आहे. हे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र या कामात अनेक अडचणी असल्याने या कामाला पाच दिवस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशा आहेत अडचणी
जलवाहिनी अंथरण्यासाठी दहा फुट खड्डा खोदण्यात येत आहे. आधीची जलवाहिनी कापल्या नंतर या जलवाहिनी एलबो तसेच पुढे टी जोडण्याचे काम करावे लागणार आहे. या मार्गात जमिनी खालून 33 केव्ही आणि 11 केव्ही विद्युत तारा (केबल), विविध कंपन्यांचे मोबाईलचे केबल गेल्या आहेत. या तारांच्या खालून जलवाहिनी टाकावी लागणार आहे.
महापालिकेने महावितरणकडे जलवाहिनी टाकण्यासाठी काही तासाचे शट डाऊन करण्याची विनंती केली. मात्र या फिडरवरुन सर्वोपचार रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय आदी महत्वाच्या भागाला वीज पुरवठा होतो. विशेषत: रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडीत केल्यास रुग्णावर उपचार करताना अडचणी येवू शकतात. त्यामुळे महापालिकेला मोठी जोखीम स्विकारुन जलवाहिनी अंथरावी लागणार आहे.
प्राणहानी झाल्यास जबाबदार कोण?
सडके खाली पाच फुटावर विद्युत केबल आहेत. या केबलला धक्का न लावता खड्डा करावा लागणार आहे. त्यामुळे चार फुटापर्यंत जेसीबीने खोदकाम केल्या नंतर उर्वरित खोदकाम मॅन्युअली पद्धतीने करावे लागणार आहे. हे काम करताना मजुर, कामगारांच्या जीवास धोका झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
मजुरीचा खर्च नॅशनल हायवे करणार
पुलाच्या लॅडींगचे काम करण्यापूर्वी जलवाहिनी बदलण्याची जबाबदारी नॅशनल हायवे कार्यालयाची होती. मात्र पैसे वाचवायच्या नादात जलवाहिनी लॅडींग खाली ठेवण्यात आली. त्यामुळेच पाईप, एलबो, टी आदींचा खर्च महापालिका करणार असून मजुरीचा खर्च नॅशनल हायवे कार्यालयाकडून केला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.