आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंजी येथे पोलिसांचा छापा:घरातून 175.28 किलो वजनाचा सुगंधी तंबाखू जप्त; आरोपीस अटक

प्रतिनिधी | वर्धा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंजी येथे सुगंधी तंबाखूची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला मिळताच, अन्न व औषध प्रशासन सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून घरात असलेला रिमझिम, बादल, भाग्य व जाफराणी सुगंधीत तंबाखूसह १ लाख ६ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत एक आरोपीला अटक केली. तर आणखी दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना, आंजी येथील महेंद्र पांडुरंग रेवतकर वय ४२ या व्यक्तीच्या घरी सुगंधीत तंबाखूची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. अन्न व औषध प्रशासन सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबतीला घेऊन छापा टाकला असता,आरोपीच्या घरी विविध प्रकारचा जाफराणी तंबाखू दिसून आला. रिमझिम, बादल, भाग्य, जाफराणी, जनम सुगंधीत तंबाखू व पानमसाला, पानपराग प्रीमियमसह वेगवेगळ्या कंपनीचा १७५.२८ किलो वजनाचा तंबाखू जप्त केला. व आरोपीला ताब्यात घेत खरांगणा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विराग वैरागडे रा. बुट्टीबोरी व शुभम होलानी रा. वर्धा या व्यापाऱ्यांकडून तंबाखू खरेदी करण्यात आला असल्याने त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघेही फरार आहेत. ही कारवाई शुक्रवारी रात्रीच्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.