आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो यात्रेचा जिल्ह्यात 45 कि.मी.चा प्रवास:16 नोव्हेंबर रोजी होणार आगमन; राहुल गांधींसोबत चर्चेसाठी 16 संघटनांचे प्रस्ताव

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जाेडाे यात्रेचे 16 नाेव्हेंबर राेजी जिल्ह्यात आगमन हाेणार असून, यात्रा जिल्ह्यातून 45 कि.मी.चा प्रवास करणार आहे. यात्रेत खा. गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थी, कामगारांसह 16 विविध संघटनांचा प्रस्ताव आलेला आहे.

लाेकशाहीच्या रक्षणासाठी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन बुधवारी काँग्रेसतर्फे आयाेजित पत्रकार परिषदेत करण्यात आले. पत्रकार परिषदेला प्रामुख्याने माजी राज्यमंत्री प्रा. अजहर हुसेन व माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी संबाेधित केले. तसेच यात्रेबाबत यात्रेचे समन्वयक प्रशांत गावंडे, युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढाेके यांनीही मािहती िदली.

भारत जाेडाे यात्रा महाराष्ट्रात 07 नोव्हेंबर रोजी दाखल हाेणार आहे. ही यात्रा अकोला जिल्ह्यात पातूर येथे 16 नोव्हेंबर रोजी येणार आहे. देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी, व्यापारी, शेतमजुरांसमाेर प्रचंड आव्हाने असतांना पंतप्रधान मात्र उद्योगपती मित्रांच्या हितासाठी काम करत आहेत, अशी टिका काँग्रेस नेत्यांनी केली. सध्या नागरिक प्रचंड अस्वस्थ असून, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राहुल गांधी यांची 3500 कि.मी.ची भारत जोडो पदयात्रा देशाभर सुरू आहे. ही यात्रा इतिहास घडवेल, असा विश्वास प्रा. हुसेन यांनी व्यक्त केला. भारत एकसंघपणे पुन्हा जोडल्या जावा, हा देश अखंड राहावा असे वाटणाऱ्या प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहनही काँग्रेस नेत्यांनी केले.

समविचारींनी सहभागे व्हावे

भारत जाेडाे यात्रेत सर्वच समविचारींना सहभागे हाेणे आवश्यक असल्याचे काँग्रेस​​​​​​​ नेते म्हणाले. खा. राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी ईपीएस 95 पेन्शनधारक समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, िवद्याथी संघटना, एकल महिला संघटना, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांसह अन्य संघटनांचे प्रस्ताव आलेले आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ति व संघटनांचाही प्रस्ताव येत आहेत. यात्रेत मेधा पाटकर यांच्या िटमधून 500 महिला यात्रेत सहभागी हाेणार आहेत, अशी मािहती यात्रेचे समन्वयक प्रशांत गावंडे यांनी दिली.

असा राहणार मार्ग

भारत जाेडाे यात्रा 16 नाेव्हेंबर राेजी रात्री पातूर तालुक्यात येणार आहे. 17 नाेव्हेंबर राेजी सकाळी 6.30 वाजता पातूर येथील शाह बाबू हायस्कूल येथून यात्रा बाळापूरकडे रवाना हाेईल. दुपारी 3.30 वाजता हिंगणा उजाडे येथे आगमन हाेणार आहे. त्यानंतर बटवाडी फाटा येथे मुक्काम राहणार आहे. 18 नाेव्हेंबर राेजी सकाळी 6.30 वाजता यात्रा कुपटा येथील जि.प. शाळेतून बुलडाणा जिल्ह्याकडे रवाना हाेणार आहे. शेगाव येथे खा. राहुल गांधी यांची सभा हाेणार असून, सभेला ५ लाखांवर नागरिक हजर राहण्याची शक्यता काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...