आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे महानगरात आगमन होत असून त्याची जय्यत तयारी शक्तिधाम सेवा समिती व आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने जोमाने सुरू करण्यात आली आहे, शक्तिधाम सेवा समितीचे अध्यक्ष वसंत खंडेलवाल यांनी दिली. बुधवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी शक्तिधाम सेवा समितीचे सेवाधारी, ज्येष्ठ उद्योजक सुशीलकुमार खोवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, आर्ट ऑफ लिविंगचे हरीश लाखानी, कपिल ठक्कर, रामकृष्ण दालमिया आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानीय गीता नगर परिसरात निर्माणाधिन शक्तीधाम वास्तुचे निर्माण कार्य सुरू असून महानगरात या माध्यमातून एक भव्य दिव्य वास्तू साकारत आहे. ही भव्य वास्तू शक्तिधाम सेवा समितीच्या अंतर्गत संचालित होत आहे. या वास्तूच्या मुख्य गर्भगृहाचा शिलान्यास आगामी सोमवार 27 फेब्रुवारी रोजी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते होत आहे.
वास्तू शिलान्यासच्या सोहळ्यानंतर सायंकाळी 6 वाजता गोरक्षण रोड परिसरातील गोरक्षणच्या एकविरा मैदानात महासत्संग भक्तीपर्व आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये गुरुदेव हजारो नागरिक, महिला, पुरुषांना संबोधित करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सोमवार 27 फेब्रुवारी रोजी श्री श्री रविशंकर यांचे 12.30 वाजता विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर 1 वाजता गीता नगर येथील शक्तीधाम वास्तूच्या गर्भगृहाचा शिलान्यास सोहळा होणार आहे.
28 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता गुरुदेव हे खंडेलवाल भवन येथे आर्ट ऑफ लिविंगच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. त्यानंतर सकाळी 10 वाजता खंडेलवाल भवन येथील कार्यक्रम आटपून गुरुदेव शिवनी विमानतळाकडे कूच करून नाशिकसाठी प्रयाण करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बऱ्याच वर्षानंतर गुरुदेव यांचे अकोला आगमन होत असून हा महासत्संग सोहळा भव्य दिव्य साकार करण्यात येणार आहे.
यासाठी शक्तिधाम सेवा समिती व आर्ट ऑफ लिविंगचे शेकडो पदाधिकारी मेहनत करीत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महासत्संग भक्तीपर्व सोहळ्याचा अकोलेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन शक्तिधाम सेवा समिती व आर्ट ऑफ लिविंगचे प्रमुख सेवाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.