आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम कुंड:अकोट फैल येथे गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जनच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी अकोट फैल परिसरात नागरिकांसाठी कृत्रिम कुंडाची व्यवस्था भाजप युवा मोर्चा उत्तर मंडळच्या वतीने करण्यात आले आहे.

अकोट फैलातील हनुमान चौक, लाडीस फैल, परदेशी पुरा, मोची पुरा, संत कबीर नगर, बापू नगर, शंकर नगर, भोई पुरा, साधना चौक, आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे नगर, पिंपळफैल, टायगरवाडी, भीम चौक तसेच प्रभाग क्र. २ मधील गणेश भक्तांच्या सोयीसाठी हनुमान मंदिरा समोर हनुमान चौक अकोट फैल येथे गणपती विसर्जनासाठी हा कृत्रिम कुंड निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश भक्तांची विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये व नागरिकांना शांततेने गणेश विसर्जन करता यावे, या दृष्टीने भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष व जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी गणपती विसर्जनासाठी संगीतमय वातावरणात विधिवत पूजा स्थान व गणपती निर्माल्यसाठी वेगळी व्यवस्था व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, गणेश मूर्ती विसर्जन कुत्रिम घाट व मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य संकलन, मूर्ती पूजा व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश भक्तांनी हनुमान मंदिरा समोर हनुमान चौक अकोट फैल येथे ९ सप्टेंबरला स. ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत या कृत्रिम गणेश कुंडाचा गणेश भक्तांनी विर्सजनासाठी लाभ घेण्याचे आवाहन नितीन राऊत व मित्र परिवाराने केले.

बातम्या आणखी आहेत...