आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापडियानगर भागात घरगुती विसर्जनासाठी कृत्रिम टाक्या:निर्माल्य संकलनाही केले जाणार, भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दहा दिवसापासून उत्साह, आनंदात सुरु असलेल्या गणेशोत्सव अखेरच्या टप्प्यात आला आहे. लाडक्या बाप्पाला 9 सप्टेंबर रोजी निरोप दिला जाणार आहे. या अनुषंगानेच येथील तापडीया नगर भागातील भारत विद्यालया समोरील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर गणपती विसर्जनासाठी सर्व सोयींनी युक्त कृत्रिम टाक्याची(तलाव) व्यवस्था तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील भाविकांनी या कृत्रिम गणेश घाटावर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा, असे आवाहन आवाहन आयोजकांनी केले आहे.

खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा,आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, माजी महापौर अर्चना मसने यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका सौ. गितांजली शेगोकार, माजी नगरसेवक राहुल देशमुख, माजी नगरसेवक हरीश काळे, सामाजिक कार्यकर्ते सागर शेगोकार यांच्या पुढाकाराने जठारपेठ, रामदास पेठ ,तापडीया नगर, राऊत वाडी,न्यु तापडीया नगर,खरप, आदी विविध भाग तसेच प्रभाग क्रमांक 6 व प्रभाग क्रमांक 3 मधील गणेश भक्तांच्या सोयीसाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भारत विद्यालय समोर, तापडीया नगर येथे सर्व सुविधायुक्त गणपती विसर्जनासाठी तलाव निर्माण करण्यात आला आहे.

स्वखर्चाने सागर शेगोकार, हरीश काळे, राहुल देशमुख यांनी गणपती विसर्जनासाठी संगीतमय वातावरणात विधिवत पूजा स्थान व गणपती निर्माल्य साठी वेगळी व्यवस्था व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महापालिकेने मोर्णा नदीकाठी तयार केलेल्या विविध गणेश घाटावरील गर्दी कमी होण्यास या कृत्रिम टाक्यांमुळे मदत मिळणार आहे. या ठिकाणी संकलीत झालेल्या गणेश मुर्त्यांचे विसर्जन पूर्णा नदीत म्हैसांग येथे केले जाणार आहे.

तर संकलीत केलेले निर्माल्य खत निर्मितीसाठी दिले जाणार आहे. शुक्रवार 9 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्या पासून गणेश भक्तांना गणपती विसर्जन करता येणार असून सायंकाळी सहा वाजे पर्यंत गणेश विसर्जन सुरु राहणार आहे. या सेवेचा लाभ परिसरातील गणेश भक्तांनी घ्यावा, असे आवाहन युवाशक्ती प्रतिष्ठान मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...