आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आमदार नितीन देशमूख संतप्त:विकास कामे रखडल्याने शिवसैनिकांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच मांडला ठिय्या

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याचा आराेप करीत शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनील शिवसैनिकांसह बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या आंदाेलन केले. शिवसेना नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसैनिक माेठ्या संख्येने जमा झाल्याने पोलसांनी धाव घेतली. िजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात बाहेर पोलिसांचा तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. या कामांशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच आतमध्ये प्रवेश देण्यात येत हाेता. रात्री उशिरापर्यंत हे नाट्य रंगले हाेते.

पातूर नगर परिषदेसाठी विकास कामांसाठी निधी मंजूर केला. त्यानंतर नगर परिषदेची हद्दवाढ झाली. हद्दवाढमध्ये नजीकच्या शिर्ला ग्राम पंचायतचा काही भाग समाविष्ट झाला. मात्र प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले. यंदा अनेक कामांना प्रशासकीय मान्यता प्रशासनाकडून रखडली. दरम्यान याबाबतचा जाब विचारण्यासाठी बुधवारी संध्याकाळी िशिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, अकाेला पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, मंगेश काळे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. त्यांनी जिल्हाधिकारी निमा अराेरा यांच्याशी चर्चा करीत प्रशासकीय मान्यता का मिळत नाही, असा सवाल केला. रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरू हाेती. जवळपास 29 काेटींची विकास कामे रखडल्याचे समोर आले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर पोलिसांचा पहारा

विकास कामांवरून जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना नेते आक्रमक झाले. तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संताेष महल्ले यांच्यासह अधिकाऱ्यांनी धाव घतेली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बंदाेबस्त तैनात करण्यात आला.

शिवसेना नेते बंदद्वार असल्याची मािहती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शिवसैनिकांनी धाव घेतली. रात्री 10 वाजताच्या सुमारास पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे जिल्हाधिकारी यांच्या कक्षात दाखल झाले.

लाेकप्रतिनिधींना बदनाम करण्याचे काम

मी आज संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी विकास कामांबाबत संपर्क साधल्याचे आमदार नितीन देशमुख यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांनी फाेन उचलला नाही. 2019 ते 2021 या काळातील अनेक कामे प्रलंबित आहेत. शासनाने निधीही मंजूर केला आहे; परंतु प्रशासकीय मान्यता िमळत नसल्याचे जिल्हाधकारी कार्यालयात मी आलाे पण विकास कामात अडथळा निर्माण केला जात आहे. लाेकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा प्रयत्न हाेत आहे, असेही आ. देशमुख म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...