आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:कामांना स्थगिती असल्याने पंधराव्या वित्त आयाेगाच्या निधीवर झाली चर्चा

अकाेला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत अनेक कामांना सध्या राज्य सरकाराकडून स्थगिती देण्यात आल्याने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभेत केवळ पंधराव्या वित्त आयाेगाअंर्तगत कामांवर चर्चाच करण्यात आली. ही तहकूब असल्याने आणि विषय सूचीवरही महत्त्वाचे विषय नसल्याने वेळेवर येणाऱ्यांवर निर्णयच घेता आले नाहीत.

ग्रामवकास विभागाकडून गाव विकास आराखड्यानुसार ग्रामपंचायतींना निधी वितरीत करण्यात येताे. एप्रिल २०२० मध्ये जिल्हा परिषदेला २६ कोटी ५२ लाखाचा निधी प्राप्त झाला हाेता. या निधीपैकी ८० टक्के निधी ग्रामपंचायत स्तरावर, आणि प्रत्येकी १० टक्के निधी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदस्तरावर वितरीत करण्यात आला. निधी मिळल्याच्या कालखंडात काेराेना विषाणूचा प्रादूर्भाव राेखण्यासाठी टाळेबंदी लागू हाेती.

त्यामुळे खर्च करण्यात आला नाही. त्यानंतर जूनमध्ये दुसऱ्या टप्प्यात पुन्हा २६ कोटी ५२ लाख प्राप्त झाले. हा निधी सुद्धा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर वितरीत करण्यात आला. मात्र, निधी खर्च करण्याबाबत शासनाचे कोणतेही निर्देश नसल्याने निधी हाेते. मार्गदर्शक तत्वे जारी झाल्यानंतर कामांचा मार्ग माेकळा झाला हाेता. मात्र आता कामांच्या नियाेजनावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये एकमत हाेत नसल्याचे िदसून येत आहे. काही दिवसांपूर्वी विराेधकांनी एक विविध विभागांची बैठक घेऊन कामांचे स्वतंत्र प्रस्ताव सादर केले.

बातम्या आणखी आहेत...