आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेतील पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या चारही झोन अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. हे चारही अधिकारी प्रभारी असून महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने या चार झोनची जबाबदारी प्रशासन आता कोणत्या कर्मचाऱ्यांकडे देणार? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
महापालिकेत वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 ची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कामकाज सुरू आहे. महापालिकेचा आकृतीबंध अद्याप मंजुर न झाल्याने कर्मचाऱ्यांची भरती महापालिकेला करता येत नाही. तर दुसरीकडे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अतिरिक्त आयुक्त ही प्रशासकीय पदेही गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त आहेत. परिणामी आयुक्ता नंतर महापालिकेचे कामकाज पूर्णपणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या खाद्यावर येवून पडले आहे. अधिकारी नसल्याने एका अधिकाऱ्यांकडे, विभाग प्रमुखाकडे दोन ते तीन विभागाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत
एकाच वेळी अनेक कामे करावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांचानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. थोडी जरी चुक झाली तर प्रशासनाची बोलणी खावी लागतात. अशाही परिस्थितीत काम केल्या नंतरही प्रशासन कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत नाखुष आहे. यातून झोनल अधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
चार पैकी तीन जणांकडे दोन विभाग
चार झोनल अधिकाऱ्यांपैकी केवळ एकाकडे पूर्णपणे झोन कार्यालयाच्या कामकाजाची जबाबदारी आहे. तर उर्वरित तीन झोनल अधिकाऱ्यांकडे झोन कार्यालयाच्या जबाबदारी व्यतिरिक्त अन्य विभागाचाही प्रभार आहे.
प्रभार देणार कोणाला?
महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असताना या चारही झोन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यास, त्यांच्या जागी झोन अधिकारी पदाचा प्रभार नेमका कोणाला देणार? अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे. ज्या कर्मचाऱ्याकडे झोनल अधिकाऱ्याचा प्रभार दिला जाईल, त्या अधिकारी-कर्मचाऱ्यावर दोन-दोन विभागाच्या जबाबदाऱ्या येतील तसेच झोन अधिकारी म्हणून प्रथमच कामकाज करताना अडचणींचा सामनाही करावा लागणार आहे. त्यामुळे तारेवरच्या या कसरतीत कोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्रमांक लागणार? अशी चर्चाही सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.