आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या पृथ्वीचा अक्ष तिच्या भ्रमण कक्षेशी साडे तेवीस अंशांनी कलून फिरत असल्याने प्रत्येक दिवशी सूर्य आपली जागा बदलत असते, हा फरक मात्र काही काळानंतर लक्षात येतो. गुरुवार, 22 डिसेंबरला सूर्य नेमका पृथ्वीच्या मकर वृत्तावर येईल व तेथून पुढे उत्तरेकडे सरकताना उत्तरायण सुरू झालेले असते. या दिवशी आपल्या भागात सर्वात मोठी रात्र आणि सर्वात लहान दिवस असेल. यालाच 'अयनदिन' म्हणून ओळखतात.
अंतराळातील हालचाली अशा
यावेळी सूर्य दक्षिण गोलार्धाकडे झुकलेला असल्याने त्या भागात उन्हाळा आणि आपल्या उत्तर गोलार्धात हिवाळा हा ऋतू असतो. तसेच दक्षिण ध्रुवावर दीर्घ कालावधीची रात्र आणि उत्तर ध्रुवावर दिर्घ कालावधीचा दिवस सुरू असतो. या दिवसापासून सूर्याचा प्रवास मकर वृत्तापासून कर्कवृत्तापर्यत अर्थात उत्तरायण सुरू होऊन ते 21 जूनपर्यंत चालते.
22 डिसेंबर रोजी सर्वात लहान दिवस पावणे अकरा तासांचा व सव्वा तेरा तासांची खूप मोठी रात्र असते. अयनदिनापासूनच दिनमान वाढत जाते. परंतु फरक मात्र मकर संक्रांतीपासून लक्षात येत असल्याने जनमानसात संक्रांती पासुन दिवस तीळातिळाने वाढत असल्याची प्रथा रुढ झाली आहे.
सध्या स्थितीत पाचही ग्रह सायंकाळी नुसत्या डोळ्यांनी पाहता येतील. रात्रीच्या प्रारंभी पूर्व क्षितिजावर वृषभ राशीत लालसर रंगाचा मंगळ ग्रह, आकाश मध्यावर सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेला गुरुग्रह मीन राशीत, जरा पश्चिमेस शनी ग्रह मकर राशीत, पश्चिम क्षितिजावर तेजस्वी ग्रह शूक्र व सर्वात लहान बुध ग्रह धनु राशीत बघता येईल.
5 ग्रह सायंकाळी डोळ्यांनी दिसतील
''सूर्य सरकल्याच्या स्थितीमुळे पृथ्वी वरील बदल लक्षात घेऊन स्वच्छ आणि निरभ्र आकाशात मुक्त संचार करणाऱ्या ग्रहांच्या भेटीसाठी आपण सर्वांनी सज्ज व्हायला हवे.'' - प्रभाकर दोड,
विश्वभारती केंद्र संचालक, अकोला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.