आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Atrocities On Girlfriends In Akola Are Punishable By Up To Five Years In Prison, While Those Who Help Are Sentenced To Two Years In Prison.

अकोल्यात मैत्रिणीवर बलात्कार:आरोपीला पाच वर्षांची, तर मदत करणाऱ्यास 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अकोला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (पहिले) शायना पाटील यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच या कृत्यात आरोपीला मदत करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दाेन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल न्यायालयाने सोमवारी दिला.

प्रमोद उर्फ पिंटू माणिकराव पवार व विक्रम उर्फ विक्की हिरालाल तायडे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. 5 नोव्हेंबर 2011 रोजी अल्पवयीन पीडिता ही घरी असताना आरोपी विक्रमने तिला हातावर मेहंदी काढून देतो, असे म्हणून आरोपी प्रमोद पवार याच्या घरी नेले. तिथे प्रमोद पवार या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पीडीतेच्या आईने जुने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली.

पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध भांदविचे कलम 376,511,354,34 नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपासा पीएसआय भूषण गावंडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे न्यायालयात सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत आरोपी प्रमोद उर्फ पिंटू माणिकराव पवार व विक्रम उर्फ विक्की हिरालाल तायडे यांना कलम 235 (2) सीआरपीसीनुसार कलम 376, 511 आयपीसीमध्ये आरोपी प्रमोद पवार यास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा सादा कारावासाची शिक्षा व आरोपी विक्रम तायडे यास दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

सरकार तर्फे सहायक सरकारी वकील मंगला पांडे व ॲड. किरण खोत यांनी बाजू मांडली. पीएसआय सिध्दार्थ कदम व भूषण गावंडे यांनी तपास केला होता. पोलिस कॉन्सटेबल अंकुश फोकमारे व एएसआय काझी यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...