आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील राष्ट्रीय महामार्गावरील खवले हार्डवेअरला लागून असलेल्या हिताची कंपनीचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी रविवारी १२ मार्चच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केला. परंतु हार्डवेअरच्या संचालकांना याची चाहूल लागताच ते खाली उतरत असतानाच चोरटे पसार झाले होते. घटनास्थळावरील पुराव्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने दहा तासाच्या आतच आरोपीला अटक केली.
त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मोहन खवले यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. हार्डवेअरला लागूनच हिताची कंपनीचे एटीएम असून, हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न रविवारी १२ मार्चच्या रात्री ११.३० ते ११.५५ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी केला होता. एटीएमपासून काही अंतरावर रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास शहर पोलिसांची गाडी उभी होती. ही गाडी गेल्यानंतर लागलीच अज्ञात चोरट्यांनी या एटीएममध्ये प्रवेश करून एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. त्यानंतर चोरट्यांनी एटीएमचे फ्रंट पॅनल तोडून आतील लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. चोरटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना आवाज झाल्याने मोहन खवले हे खाली उतरून आले असता त्यांची चाहूल लागल्याने दोघेजण एटीएम पासून काही अंतरावर अंधारात उभी केलेल्या मोटरसायकल वरून घाईने पळताना दिसले होते. रात्र गस्तीवरील मूर्तिजापूर शहर पोलिस व माना पोलिस घटनास्थळी पोहाेचले होते.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला होता. सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने रूपेश श्रीकृष्ण काळे (वय २८ रा. चिखली गेट, हमु. गणेश नगर मूर्तिजापूर) याला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला कोण कोण साथीदार होते याचा शोध पोलिस घेत आहेत.
‘एलसीबी’ने १० तासात आरोपी पकडला : पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या पथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली व त्यांचे पथकातील पीएसआय गोपाल जाधव व पोलिसांनी तपास सुरु केला आणि दहा तासात गुन्हा उघडकीस आणून रूपेश श्रीकृष्ण काळे याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोपाल जाधव, एएसआय गणेश पांडे, उदय शुक्ला, गोकुळ चव्हाण, लिलाधर खंडारे आणि राहुल गायकवाड यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.