आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (पहिले) शायना पाटील यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच या कृत्यात आरोपीला मदत करणाऱ्यालासुद्धा न्यायालयाने दाेन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल न्यायालयाने सोमवारी दिला.
प्रमोद उर्फ पिंटू माणिकराव पवार वय २५ व विक्रम उर्फ विक्की हिरालाल तायडे वय २५ असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. ५ नोव्हेंबर २०११ रोजी अल्पवयीन पीडिता ही घरी असताना आरोपी विक्रमने तिला हातावर मेहंदी काढून देतो, असे म्हणून आरोपी प्रमोद पवार याच्या घरी नेले. तिथे प्रमोद पवार या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पीडीतेच्या आईने जुने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध भांदविचे कलम ३७६,५११,३५४,३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपासा पीएसआय भूषण गावंडे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे न्यायालयात सात साक्षीदार तपासण्यात आले.
न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत आरोपी प्रमोद उर्फ पिंटू माणिकराव पवार व विक्रम उर्फ विक्की हिरालाल तायडे यांना कलम २३५(२) सीआरपीसीनुसार कलम ३७६,५११ आयपीसीमध्ये आरोपी प्रमोद पवार यास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा व आरोपी विक्रम तायडे यास दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणी सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकिल मंगला पांडे व ॲड. किरण खोत यांनी बाजू मांडली, पीएसआय सिध्दार्थ कदम व भूषण गावंडे यांनी तपास केला होता. पोलिस कॉन्स्टेबल अंकुश फोकमारे आणि एएसआय काझी यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.