आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मार्गदर्शन:उर्दू कार्यपुस्तिका निर्मिती कार्यशाळेला तज्ज्ञांची उपस्थिती ; चार दिवसीय कार्यक्रम

बार्शीटाकळी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उर्दू भाषा विभाग महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत चार दिवसीय उर्दू भाषा कार्यपुस्तिका निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथील संचालक एम. डी. सिंह (भाप्रसे), रमाकांत काठमोरे सह संचालक, डॉ. कमलादेवी आवटे उपसंचालक भाषा विभाग, अरुण सांगोलकर उपविभाग प्रमुख, तवसिफ परवेज यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

दिनांक ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२२ या कालावधीत उर्दू भाषा विभाग मार्फत संपूर्ण राज्यातील उर्दू माध्यमातील इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृतीपुस्तिका निर्मिती कार्यशाळा महात्मा फुले हॉल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत राज्यातील २७ तज्ञांची उपस्थिती होती. तसेच तवसिफ परवेज, एम. मुजफ्फर यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली व संपूर्ण राज्यातील इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना कशाप्रकारे सहजरीत्या कार्यपुस्तिका उपलब्ध करून देता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यपुस्तिका तयार करण्यासाठी इयत्ता सहावी, इयत्ता सातवी, इयत्ता आठवी अशाप्रकारे तीन वेगवेगळे ग्रुप तयार करून कार्यपुस्तिकाचे कार्य करून घेण्यात आले.

या प्रकारे तीन दिवसीय कार्यपुस्तिक निर्मिती कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाल्याबद्दल वरिष्ठांनी समाधान व्यक्त केले. या वेळी महाराष्ट्र राज्यातील तज्ञांमध्ये मोहम्मद इक्बाल सिद्दिकी जि. प. शाळा अंजी (ता. जि. वर्धा), तारिक अस्लम मालेगाव, शाहिद इक्बाल खान सरफराज खान जि. प. उर्दू शाळा महान बार्शीटाकली जि अकोला, शेख शागिर्द अहेमद गुलशने अतफाल उर्दू शाळा उस्मानाबाद, मो. रिजवान अब्दुल रहीम, सय्यद सलाउद्दीन सय्यद हकीमद्दिन, डॉ. शेख नबील, डॉ. मुबाशशीर इब्राहिम, जमदार अब्दुल मोहसीन अब्दुल मुनाफ जिल्हा परिषद उर्दू शाळा वाकळी ता. जामनेर जि. जळगाव, अब्दुल्ला जिया अहमद, शबाना जकीउद्दीन सिद्दिकी, सुममया अब्दुल रशीद, समीना नजीर खलिफा, सबिहा एस. ए. शेख, खान कुरातुल ऐन, जिनत अय्युब शेख, मो. सलीम उस्मानी, मन्सूर अखतर, मो. सलीम अब्रार आलम, मो. अन्वर शेख, गुलाम हुसेन, शबनम उस्मान पीर, खान शेख फय्याझोद्दीन हुसेन, डॉ. मोहम्मद राफे मोहम्मद कमालोद्दीन, जावेद अहेमद, काजी माहेमुद नवाज व राज्यातील तज्ज्ञांची कार्यशाळाला उपस्थिती होती.

प्रत्येक वर्गासाठी विशेष कृती पुस्तिका कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्याकरिता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने प्रत्येक वर्गासाठी विशेष कृती पुस्तक तयार करण्यात येत आहे. पुस्तकाचे लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच होणार. पुणे येथे झालेल्या कार्यशाळेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक एक उर्दू शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये अकोला जिल्ह्यातून महान जिल्हा परिषद शाळेचे अध्यापक शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांची निवड करण्यात आली होती. - अनिसोद्दीन कुतबोद्दीन, राज्यस्तरिय अभ्यासगट सदस्य

बातम्या आणखी आहेत...