आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक आपत्ती:उपाय योजना बैठकीत आमदारांसह महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती ; लोकप्रतिनिधींना माहिती

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालकमंत्री बच्चु कडू यांच्या आदेशान्वये आयुक्त कविता द्विवेदी यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापना संदर्भात केलेल्या उपाय योजनांची माहिती जिल्ह्यातील आमदारांना दिली. या बैठकीला आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार गोवर्धन शर्मा,आमदार नितीन देशमुख उपस्थित होते. या बैठकीत मनपा आयुक्‍तांनी शहरात उद्भवणारी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांबाबत प्रोजेक्टरवर पी.पी.टी.द्वारे माहिती दिली. मागीलवर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील ज्या सखल भागामध्ये पाणी साचले होते आणि मोर्णा नदीला पूर आल्यामुळे शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले होते. नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते. यावर उपाययोजना म्‍हणून शहरातील एकूण २४९ छोटे मोठे नाले असून, त्यापैकी २३३ नाल्यांची सफाई झाली असून, उर्वरित १६ नाल्यांची सफाई पोकलेन मशीनद्वारेे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याची माहिती दिली. ११ जूनला आलेल्या पुर्व मौसमी वादळी पावसामुळे काही भागात पावसाचे पाणी तुंबले होते. नागरिकांच्या आलेल्या तक्रारी वरून तातडीने कामे करण्यात आली. पूरपरिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना करणे सोईचे व्हावे यासाठी पोहणाऱ्या व्यक्तींच्या एनजीओंची यादी त्यांचे संपर्क क्रमांकासहीत तयार करण्यात आली आहे. आदी विविध उपाय योजना करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापना बाबत केलेल्या उपाय योजनाबाबत आमदारांनी समाधान व्यक्त केले. तसेच नाला सफाईसह विविध सूचनाही प्रशासनाला केल्या. बैठकीला मनपा उपायुक्त डॉ.पंकज जावळे, पुनम कळंबे, अनिल अढागळे, सहा.आयुक्त अतिक्रमण जगदीश देशमुख, क्षेत्रीय अधिकारी विजय पारतवार, विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, दिलीप जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनियार, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एच.जी.ताठे, मोटर वाहन व निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, स्वीय्य सहायक, आयुक्त जितेंद्र तिवारी, विद्युत विभागाचे अमोल डोईफोडे, एन.यु.एल.एम.चे गणेश बिल्लेवार, जी.आय.एस.विभाग प्रमुख चंदन प्रसाद, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे आदी उपस्थित होते.मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात लोकप्रतिनिधींना माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...