आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे पुरस्कार वितरण ; सामर्थ्य फाउंडेशनचा उपक्रम

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामर्थ्य फाउंडेशनद्वारे रविवारी टिळक पार्क येथे पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट व देखावा स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयेजित केला हाेता. फाउंडेशनच्या विविध समाजसेवी उपक्रमांतून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. आगामी काळात ‘सामर्थ्य’च्या माध्यमातून समर्थ सामाजिक चळवळ निर्माण होईल, असा विश्वास पर्यावरण अभ्यासक व ज्येष्ठ पक्षिमित्र दीपक जोशी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वसुधा देव हाेते. व्यासपीठावर पुरस्कार प्रायोजक चिन्मय देव, संस्थेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, सचिव डॉ. गजानन वाघोडे, स्पर्धा समन्वयक प्रवीण पळसपगार, सूर्यकांत बुडकले, प्रशांत चाळीसगावकर यांची उपस्थिती होती. पाहुण्यांचे स्वागत वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कायदेविषयक सल्लागार ॲड. संतोष भोरे, कार्यकारिणी सदस्य श्रीराम देशपांडे, किरण चौक, दिनेश चंदन, विजय शिंदे, राजेंद्र निकुंभ, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, सुधीर धुळधुळे, मिलिंद शनवारे, मुकुंद देशमुख आदींनी केले.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परीक्षक दीपक जोशी व ज्येष्ठ व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनी स्पर्धकांच्या गणेशोत्सवाचे निरीक्षण करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला. पर्यावरणपूरक सजावटीचे अनेक कल्पक मार्ग गणेश भक्तांनी शोधले आहेत. मातीची गणेश मूर्ती व पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट करणाऱ्या गणेशभक्तांना स्पर्धेतून प्रोत्साहित करण्यात आल्याचे संस्थाध्यक्ष प्रबोध देशपांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. संस्थेद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती ॲड. संतोष भाेरे यांनी दिली. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक सोनोने यांनी केले, तर आभार डॉ. गजानन वाघोडे यांनी मानले. निसर्गाच्या सान्निध्यात कार्यक्रम : स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा टिळक पार्क येथे अभिनव पद्धतीने निसर्गाच्या सान्निध्यात घेण्यात आला. यावेळी स्पर्धक व विजेत्यांना रोपटे वाटप करून वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. गणेशोत्सवात संस्थेच्या वतीने सार्वजनिक मंडळांनाही रोपट्यांचे वाटप करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...