आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थापना:सार्वजनिक  गणेशोत्सव  मंडळांना पुरस्कार; जिल्हा समितीची स्थापना

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी तथा नविड करण्यासाठी जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या आदेशान्वये जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी गत दाेन वर्षे जाहीर उत्सवांवर प्रचंड मर्यादा हाेत्या. दाेन वर्षे जाहीर कार्यक्रमांच्या संख्यांवर मर्यादित हाेती. मात्र यंदा निर्बंध हटल्याने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व अन्य उत्सव उत्साहाने सादर करण्यात येत आहेत. दरम्यान यंदाही गणेशाेत्सव माेठ्या उत्साहाने साजरा हाेणार असून, गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी समिती गठित करण्यात आली आहे यात उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार (अध्यक्ष), शासकीय- शासनमान्य कला महावदि्यालयाचे प्रतिनिधी तसेच ढोणे चित्रकला महावदि्यालयचे प्राचार्य गजानन बोबडे (सदस्य), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी होळकर (सदस्य), जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश असोले (सदस्य), जिल्ह्यातील पोलिस अधिकारी पोलिस उपअधीक्षक (गृह) नितीश शिंदे (सदस्य) यांचा समावेश असून, या समितीने जिल्ह्यातील गणेश मंडळांना भेटी देऊन त्यांचे गुणांकन राज्य समितीकडे मंगळवार १३ सप्टेंबर पर्यंत पाठवावे,असे आदेशात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...