आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसी आरक्षणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीने १ जूनपासून नागपूर येथून विदर्भ यात्रा काढण्यात आली. सोमवारी, १३ जूनला ही यात्रा अकोल्यात होती. दरम्यान या यात्रेचे मुख्य संयोजक नितीन चौधरी व इतर पदाधिकारी यांनी यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या जनजागृतीबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात कोणताच राजकीय पक्ष पुढाकार घेत नाही. त्यामुळे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची वाट लागली आहे. बिहार राज्य ओबीसींची जनगणना करते मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राकडे बोट दाखवते. प्रगतीत मागास समजल्या जाणाऱ्या मध्यप्रदेश सरकारला ओबीसीचे आरक्षण वाचविणे जमले परंतु महाराष्ट्र सरकार यामध्ये अपयशी ठरले. आता आडनावावरून ओबीसीची स्थानिक क्षेत्रातील लोकसंख्या अंदाज करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मात्र आयोग व सरकारचा हा प्रयत्न म्हणजे टाईमपास आहे. कारण एकच अडनाव अनेक प्रवर्गात येते त्यामुळे हा गलथानपणा थांबवा आदी अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे. नागपूरमध्ये २० जून रोजी या यात्रेचा समारोप होणार आहे. दरम्यान इतर जिल्ह्यात १३ जून ते १८ जून दरम्यान संवाद परिषद आयोजित करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.