आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भत्त्यावर कुऱ्हाड:पीएचसी तील दोषी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ, घरभाडे भत्त्यावर कुऱ्हाड

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) आढळलेल्या बेताल कारभारप्रकरणी काहींची वेतन वाढ राेखण्याचे तर अनेकांचा घरभाडे भत्ता बंद करण्याची िशफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र याप्रकरणी सर्वच संबंधितांकडून स्पष्टीकरण मागवणे आवश्यक असल्याचा अभिप्राय जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने नाेंदवला. त्यामुळे आराेग्य विभागाकडून ही प्रक्रिया सुरू आहे. परिणामी अंतिम कारवाई संथ गतीने सुरू असल्याचा आराेप हाेत आहे.

ग्रामीण रुग्णांना दर्जेदार व वेळेवर आराेग्य सेवा मिळत नसल्याचे अनेकदा विविध यंत्रणांनी केलेल्या पाहणीदरम्यान िदसून आले हाेते. अशातच काही िदवसांपूर्वी िजल्हा परिषद व पंचायत समितीच्या पथकांनी केलेल्या पाहणीत तीन ठिकाणी कुलूप तर काही िठकाणी डाॅक्टर, आराेग्य कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळले हाेते. बंद आढळलेल्या तीन प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नाेटीस बजावली. त्यानंतर आता सर्वच गैरहजर आढळलेले, दरम्यान प्राथमिक आराेग्य केंद्राच्या मुख्यालयी राहत नसलेल्यांकडूनही स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

काय म्हणतात डीएचओ?
गैरहजर आढळलेल्या आणि मुख्यालयी राहत नसलेल्या संबंिधत अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. स्पष्टीकरणानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम नर्णय घेण्यात येईल. डाॅ. सुरेश आसाेले, जिल्हा आराेग्य अधिकारी, जि.प.

आराेग्य समितीच्या सभेतही ठाेस निर्णयच नाही
प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्ये (पीएचसी) गत आठवड्यात आढळलेल्या बेताल कारभारावर ८ आॅगस्टला झालेल्या जिल्हा परिषद आराेग्य समितीच्या सभेत ठाेस निर्णयच घेण्यात आला नव्हता. त्यामुळे ग्रामीण भागातील आराेग्य सुविधांविषयी काेण किती गंभीर आहे, हेच यातून दिसले हाेते. आता याप्रकरणात संथगतीने कारवाई हाेत असल्याने प्रशासनाला जाब विचारणार तरी काेण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या १४ आणि पंचायत समितीच्या ७ पथकांनी जिल्ह्यातील २१ प्राथमिक आराेग्य केंद्राची पाहणी केली हाेती. या पाहणीत १७ वैद्यकीय अधिकारी
हजर नव्हते.

प्राथमिक आराेग्य केंद्रात १४२ जणांनी मुख्यालयी राहणे अपेक्षित आहे. मात्र ७१ जणच हजर असल्याचे पाहणीत िदसले हाेते.चार सहायक परिचारिका आिण ४ स्टाफ नर्स गैरहजर हाेत्या. २ महिला सुपर वायझर तर एक पुरुष सुपलरवायझर गैरहजर हाेता. सहा सफाई कर्मचारी गैरहजर हाेते.

प्राथमिक आराेग्य केंद्रात १४२ जणांनी मुख्यालयी राहणे अपेक्षित आहे. मात्र ७१ जणच हजर असल्याचे पाहणीत िदसले. या सर्वांकडून आता स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...