आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझादी गौरव पदयात्रा मंगळवारपासून:उड्डाणपुलावर 1 किमी लांब तिरंगा फडकणार, काँग्रेसतर्फे ठिकठिकाणी सभांचे आयाेजन

अकोला6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसतर्फे जिल्ह्यात ९ ऑगस्ट रोजी अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी ते स्वातंत्रदिनापर्यंत आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनिमित्त उड्डाण पुलावर १ किलोमीटर लांब तिरंगा झेंडा फडकावण्यात येणार आहे.

सर्वत्र ९ ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे महत्त्व लक्षात घेता ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत काँग्रेस पक्षातर्फे आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आहे. जिल्ह्यात ७५ कि.मी. अंतरावर आझादी गौरव पदयात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अकोला जिल्ह्यातही शहर व ग्रामिण भागात काँग्रेस पक्षातर्फे १०० कि. मी. अंतरावर आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत ढॉ. ढोणे यांनी दिली. यावेळी प्रभारी दिलीप सरनाईक, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, प्रदेश सचिव प्रकाश तायडे, साजिदखान पठाण, महेश गणगणे, महेंद्र गवई, भूषण टाले, मो. जमीर बर्तनवाले. मो. युसूफ, अफरोज खान, संजय पेटकर, राजेश नळकांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागात पदयात्रा
९ ऑगस्टला गांधीग्राम येथील महात्मा गांधीच्या पुतळ्याचे पूजन करून व केळीवेळी गावातून पदयात्रा सुरू होणार आहे. १० ऑगस्टला मूर्तिजापूर , पातूर, बाळापूर, अकोट ,तेल्हारा, तालुक्यातील यात्रा जाणार आहे.

शहरात सभांमधून मांडणार भूमिका

अकोल्यात ९ ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारकापासून इन्कमटॅक्स चौक, तुकाराम चौक येथे कॉर्नरसभा होणार आहे. दुसऱ्या दिवशी कौलखेड चौक ते हिंगणा फाटा, सिंधीकॅम्प खदान येथे कॉर्नरसभा होईल. त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत साधना चौक, मस्तान चौक, आंबेडकर चौक, साबरीया चौक, अब्दुल कलाम चौक हनुमान चौक, जुने शहर, राऊतवाडी चौक, जवाहर नगर चौक, सिव्हील लाईन चौक, पोस्ट ऑफीस व स्वराज्य भवन येथे कॉर्नर सभा होणार आहेत.

असा होईल समारोप

१५ ऑगस्टला बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा, तिवसा व महान येथे पदयात्रा जाणार आहे. अकोल्यातील स्वराज्य भवन काँग्रेस कार्यालय येथे झेंडा वंदन कार्यक्रम होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...