आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Babasaheb Listened To Buddha's Thoughts So That The Outcaste Class Could Live With Dignity; Adv. Proposition By Prakash Ambedkar| Marathi News

मार्गदर्शन:बहिष्कृत वर्गाला प्रतिष्ठेने जगता यावे म्हणून बाबासाहेबांनी बुद्धांच्या विचारांची कास धरली; अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंबेडकरी चळवळीमध्ये महाविद्वान काही कमी नाहीत. ते कुणाचे तरी गुणगान गातात व लोटांगणही घालतात. तर काही जण कायमचे मंत्रिपद टिकले पाहिजे म्हणून येड्यासारखे बडबड करतात. इथला जो बहिष्कृत वर्ग होता त्याचे बहिष्कृतपण निघाले पाहिजे, त्याला माणसाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याला समतेचा अधिकार मिळाला पाहिजे व त्याला प्रतिष्ठिने जगता यावे म्हणून बाबसाहेबांनी बुद्धाच्या विचारांची कास धरली व विजयादशमीला विचारपूर्वक धर्मांतराचे पाऊल उचलले, असे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

ते अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित धम्मचक्र प्रवर्तन धम्म मेळाव्यात लाखो जनसमुदायाला संबोधित करत होते.नाव न घेता त्यांनी रामदास आठवले यांच्यावर टीकास्त्र डागले.

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आज काही महाभाग असे म्हणायला लागले की चुकून माकून बाबासाहेबांनी हा मार्ग घेतला. दुर्दैवाने जे जे विचारवंत अशा नेत्यांच्या पाठीमागे उभे राहतात, त्यांची आपल्याला कीव करावीशी वाटते. विचारपूर्वक चाललेल्या चळवळीला खीळ घालण्याचे काम ते करत आहेत. अशा विचारवंतांचा व त्यांच्या नेत्यांचा आणि मागणाऱ्यांचा आम्ही या जाहीर सभेत धिक्कार करतो.

यावेळी त्यांनी लवकरच आणखी एक सभा होणार असून त्या सभेत आपण सविस्तर भूमिका मांडू असेही ते म्हणाले. धम्म मेळावा सुरू हाेण्यापूर्वीच पाऊस झाल्याने अकाेला क्रिकेट क्लब मैदानात अनेक ठिकाणी पाणी साचले हाेते. मंचासमाेरही दीड ते दाेन फूट पाणी हाेते. पाऊस सुरू असतानाच अॅड. प्रकाश आंबेडकर विराेधकांवर बरसले.

पावसातच अनुयायी त्यांच्या भाषणाला दाद देत हाेते. धम्म मेळाव्याला भारतीय बाैद्ध महासभेसह वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित हाेते.

यात प्रा. अंजली आंबेडकर, बाैद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे, अमन आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा अॅड. रेखा ठाकूर, अशाेक साेनाेने, डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, युवा आघाडीचे नीलेश विश्वकर्मा, अरुंधती सिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमाेद देंडवे, जि. प. अध्यक्षा प्रतिभा भाेजने, उपाध्यक्षा सावित्री राठाेड, जि. प. गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, सभापती आकाश सिरसाट, पंजाबराव वडाळ, बालमुकुंद भिरड, दिनकरराव खंडारे, प्रभा सिरसाट, शाेभा शेळके, जि. प. सदस्य रामकुमार गव्हाणकर, प्रगती गजानन दांदळे, नीता गवई, संजय नाईक, गजानन गवई, राजेंद्र पाताेडे, अशाेक सिरसाट, डाॅ. प्रसन्नजीत गवई, पराग गवई, विकास सदांशिव, शरद वसतकार, पवन गवई, मुकूंद गायकवाड आदी उपस्थित होते.

काय करायचे ते करा, पण सरपंच निवडून आणा
‘यापूर्वी आम्ही ग्रामपंचायतीमध्ये लक्ष घालत नव्हतो. मात्र आता लक्ष घालणार आहोत व पक्षाच्या वतीने उमेदवार उभे करणार आहोत. काय करायचे ते करा पण सरपंच आणा. पक्षाबरोबरच राहा. पक्षाचे पदाधिकारी जे सांगतील ते ऐका. आपली एकजूट कायम ठेवा, ही सगळ्यात महत्वाची आहे’, असेही आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अनुयायांना केले.

चळवळीतील विचारवंतांचे बाळासाहेबांनी कान टोचले
आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली अनेकांनी सत्ता मिळवली. काही तर कायमस्वरुपी खुर्चीला चिकटून बसले आहेत. अशांना कायमचे मंत्रिपद हवे आहे, असा टोला ॲड. आंंबेडकर यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लगावला. आंबेडकरी चळवळीतील मंत्र्यांच्या खुर्चीला चिकटून असलेले नेते व त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या विचारवंतांचे ॲड. आंंबेडकर यांनी कान टोचले.

आमच्यावर आरोप करणारे आता म्हणतात की ‘एकत्र बसू’
लोकसभेच्या निवडणुकांवेळी आम्ही भाजपकडे गेलो असा आरोप करणारे आता मात्र आपल्याला म्हणतात की आपण एकत्र बसू, असा टोला त्यांनी नाव न घेता काँग्रेसला लगावला. विचारस्वातंत्र्य राहिले पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...