आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रसिद्धीसाठी काहीही:आम्ही इथे केवळ फोटोसाठी, शेतकरी हाेणं फाेटाे काढण्याइतकं साेपं नाही

अकाेला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजनापूर दत्तक घेतलेल्या गावात १२ मिनिटे कडू यांची पेरणी.

खरिपात शेतकरी अगदी एकटाच हाेता. जून उजाडेपर्यंत काेणत्याही नेत्यांनी शेतकऱ्यांना गांभीर्यानं घेतलं नाही. नेते तर बियाणे, खत, पीक कर्ज यावर जून उजाडेपर्यंत बाेललेच नाही. सर्व संकटांवर मात करत बळीराजा आता स्वत:च्या बळावर पेरणीस सज्ज झाला आहे. शेतात तिफणी चालू लागल्या आहेत. भविष्याच्या चिंतेनं चालणाऱ्या या तिफणींचा वापर मात्र राजकीय पदाधिकारी फाेटाेशूटसाठी करत असल्याची वऱ्हाडात चर्चा आहे.

राजनापूर येथील प्रशांत भानुदास साबळे यांच्या शेतात १० ते १२ मिनिटे पेरणी करत अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी फाेटाे काढले. त्यानंतर गावाच्या विकासकामांबात आढावा बैठक घेतली. गावातील कामांची पाहणी केली.

मंगळवारी केवळ १०-१२ मिनिटे तिफणीवर उभे राहिलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मूर्तिजापुरात साेयाबीनची पेरणी केली. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फाेटाेही व्हायरल करण्यात आले. १० मिनिटांच्या त्यांच्या पेरणीने काय साध्य केले, अशी चर्चा गावात आहे.

फाेटाेशूट करत राणा तासभभर शेतात राबल्या.

चांदुरबाजारच्या दाैऱ्यावर असताना नया अकाेला शिवारातील प्रकाश साबळे यांच्या शेतात खासदार नवनीत राणा यांनी भेंडी आणि तुरीची पेरणी केली. हे सर्व करतानाचे फाेटाे, व्हिडिआे काढण्यात आले.

साेमवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही नया अकाेला गावात एका शेतकऱ्याच्या शेतात थांबत पेरणी केली. एकरभर वावरात त्या राबल्या. पण, त्याचेही फाेटाेशूट झाले अन् व्हिडिआेही बनले.

काही मिनिटांत तुपकरांनी दाेन एकर शेत पेरले.

डाेंगरखंडाळा येथील भास्कर सावळे यांच्या शेतात रविकांत तुपकर यांनी तिफण हातात घेतली. फाेटाेसेशनही केले. दाेन एकर पेरणी केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकरही मंगळवारी तिफणीवर हाेेते. तेथील लाेकांच्या मते २०-३० मिनिटे त्यांनी तिफण धरली. त्यांनतर थकलेल्या तुपकरांनी वावरात भाेजनाचा आस्वादही घेतला. फाेटाेही माध्यमांपर्यंत पाेहोचवले.

0