आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागासवर्गीय कंत्राटदारांना कामे दिली नाहीत, असा आराेप युवा मुक्ती आंदाेलन संघटनेचे अध्यक्ष मनाेज भालेराव यांनी केला असून, मंगळवारी अधीक्षक अभियंता कार्यालयासमाेर धरणे आंदाेलन केले.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात निधी कमी उपलब्ध न झाल्याने कोट्यावधीची देयके प्रलंबित आहेत. यावर तातडीने तोडगा न काढल्यास व अन्य मागण्या मागण्या मंजूर न झाल्यास १५ ऑगस्टपासून अमरावती येथील प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. शासकीय कंत्राटदारांच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याचे युवा मुक्ती आंदाेलन संघटनेचे म्हणणे आहे. सार्वजनिक बांधकामविभागाच्या कार्यालयाअंतर्गत काेट्यवधींचे काम अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना दिल्याचा आराेप केला. मागासवर्गीय कंत्राटदारांना कामे देण्याचे आदेश द्यावेत, असे संघटनेचे म्हणणे आहे. याबाबत बांधकामविभागाचे अभियंते, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावही केला. मात्र त्या नंतरही यावर ताेडगा निघाला नाही. २ आॅगस्टला युवा मुक्ती आंदाेलन संघटनेचे गाैरक्षण राेडवरील सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या मुख्य द्वारावरच धरणे आंदाेलन केले. त्यात मनोज भालेराव, जितेंद्र आठवले,श्रीहरी गवई, हरीश पांडे ,कुणाल भालेराव, साईल गोपणारायण, सोनाली भालेराव कोमल भालेराव ,स्वाती भालेराव, अमरदीप वाकपांजर, कुलदीप सुरळकर, निलू वाघमारे सहभागी झाले.
या आहेत संघटनेच्या मागण्या :सार्वजनिक बांधकामविभागाच्या कामांबाबत युवा मुक्ती आंदाेलन संघटनेने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या.मागासवर्गीय कंत्राटादरांना कामे देण्याचे आदेश जारी व्हावेत. कोराेना काळात झाले प्रचंड नुकसान :जिल्ह्यात गत दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात आले होते. तसेच याच काळात शासनाची आर्थिक बाजूही कमकुवत होती. परिणामी निधी पुरेसा प्राप्त न झाल्याने अनेक देयके प्रलंबित आहेत. या सर्व बाबींचा विचार करून आमच्या मागण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी युवा मुक्ती आंदोलन संघटनेतर्फे मुख्य अभियंत्यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.