आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन सभा:बहुजनांचे बेगडी पुरोगामित्व आंबेडकरी चळवळीला मारक ; प्रा. विजय आठवले यांचे मत

अकाेला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुले शाहू आंबेडकर यांचा जयघोष करीत आंबेडकरी समाजाचा व्होट बँक म्हणून वापर करायचा आिण राजकीय फायदा मिळवायचा, असे प्रकार सुरू आहेत. मात्र आंबेडकरी समूहाचे प्रश्न सोडवायचे नाहीत, हा पक्षपातीपणा सुरू असून, बहुजनांचे हे बेगडी पुरोगामित्व आंबेडकरी चळवळीला मारक ठरत आहे,’ असे मत सम्राट अशोक ब्रिगेडचे संस्थापक प्रा. विजय आठवले यांनी व्यक्त केले.

सम्राट अशोक ब्रिगेडतर्फे बौद्ध समाजाचे प्रश्न ,वर्तमान, आणि भविष्यकालीन आव्हाने, यावर घुसर येथील तक्षशिला बौद्ध विहारात प्रबोधन सभेचे आयाेजन केले. सभेत प्रा. आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सम्राट अशोक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश मोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून महासचिव निरंजन भाऊ वकोडे, सचिव प्रभाकर कवडे उपाध्यक्ष विद्याधर मोहोड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्ध यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सभेत आंबेडकरी चळवळीचे प्रतिक निळी टोपी,आणि निळा दुपट्टा घालून पाहुण्याचे स्वागत तक्षशिला बुद्ध विहार समितीच्या वतीने केले. आरक्षणासाठी लढा आवश्यक ः बौद्ध समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, अशा समस्यांवर पुढे बोलताना प्रा विजय आठवले यांनी प्रकाशझाेत टाकला. बौद्ध समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाची तरतूद असावी,यासाठी लढा गरजेचा आहे, असेही ते म्हणाले.

अत्याचाराला वाचा फाेडा ःआंबेडकरी समूहाने सम्राट अशोक ब्रिगेडच्या पाठीशी उभे राहून समाजावरील अत्याचाराला वाचा फोडावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन भीमराव गोप नारायण यांनी तर आभारप्रदर्शन रामेश्वर गोप नारायण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसठी तक्षशिला बुद्ध विहार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...