आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाने गुरूजी मंडळ, गावकरी मित्र मंडळ यांच्या वतीने कविसंमेलनाचे आयोजन मुंडगाव येथे करण्यात आले होते. कवी संमेलनात नरेंद्र इंगळे यांनी विनोदी किस्से सांगत कथामधून प्रबोधन केले.हिंदी हास्य कवी विनोद सोनी हास्य रचना सांगून लोटपोट केले. कवी हिंम्मत ढाळे, कवयत्री सुचिता खुळे यांनी रचना सादर करीत संचालनाने कवी व रसिकांचा उत्साह वाढवला. कवी विलास ठोसर यांनी //"अंगात भरू दे गं तरतरी की तुला घेईन मी भरजरी ही'' रचना सादर करून आपल्या आवाजाने मंत्रमृग्ध केले. हास्यसम्राट नितीन वरणकर यांनी हास्य विनोदी पंगत कविता सादर केली.
गझलकार कवी दिनेश मोडोकार यांनी गझल व कविता सादर केली, कवी शिवलिंग काटेकर ,कवी तेजराव भिसे ,कवी थारकर गुरूजी ,कवी संजय अरबट यांनी बहारदार हास्य विनोदा सोबत कविता सादर केल्या. सुचिता खुळे व हिंम्मत ढाळे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्ह्यातील प्रशांत गावंडे, रामप्रभूद तराळे, जि. प. सदस्या सुष्मिता सरकटे, गजानन पुंडकर, नायब तहसीलदार अनुप पुंडकर, रामचंद्र बरेठीया, कपील ढोके, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहिभाते, शिवराम डिक्कर, गणेश वाकोडे, नंदकिशोर नावकर, गजानन इंगळे, अनोख रहाणे, गजानन हरणे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक गजानन वारकरी यांनी कवी व प्रमुख पाहुण्यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. मुंडगाव वासीयांनी, पंचक्रोशीतील रसिकांनी कवीसंमेलनाचा हास्य विनोदासोबत आनंद लुटला. कार्यक्रमाच्या आयोजनात साने गुरूजी मंडळाचे पदाधिकारी, गावकरी यांनी पुढाकार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.