आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या बंगल्यामध्ये दोन दिवसांपूर्वी तोतया अधिकारी बनून एक मनाेरुग्ण शिरला होता. ‘आपण आयबीचा अधिकारी आहोत, तुमची वाहने आणि घराची कागदपत्रे दाखवा,’ असे म्हणून त्याने गदारोळ घातला होता. मात्र संशय आ ल्याने बाजोरिया यांनी पोलिसांना बोलावून त्याला ताब्यात दिले. दरम्यान, न्यायालयाने शनिवारी या आरोपीला जामिन मंजूर केला. पाेलिसांनी अधिक चाैकशी केली मात्र ‘देशाच्या गृहमंत्र्यांना गोपनीय माहिती द्यायची’ एवढेच तो पोलिस अधीक्षकांना सांगत होता.
प्रतीक संजयकुमार गावंडे (३२) असे आरोपीचे नाव आ हे. ३१ मार्च रोजी सकाळी ताे कार घेऊन बाजोरिया यांच्या बंगल्यात गेला. आ पण आ यबी अधिकारी असल्याचे सांगत त्याने तेथील कर्मचाऱ्यांकडे कागदपत्रांची मागणी केली. तसेच एकापाठोपाठ प्रश्नांचा भडिमार केला होता. त्याच्यावर संशय आल्याने गोपीकिशन बाजोरिया यांनी पोलिस अधीक्षकांना माहिती दिली होती. पोलिस अधीक्षकांनी त्याला अटक करून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्याची चौकशी केली असता मानसिक संतुलन बिघडल्यासारखी उत्तरे तो देत होता. कशासाठी बंगल्यात गेला असे विचारल्यावर तो‘ देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे गृहमंत्री यांना गोपनीय माहिती द्यायची आहे. त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला सांगणार नाही’, असे म्हणत होता.
आरोपी मानसिक रुग्ण : बाजोरिया
माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया म्हणाले, ‘पोलिस अधीक्षकांनी आ रोपीची चौकशी केली. तो मानसिक रुग्ण असल्याचे दिसत होता. मी त्याच्या आईशी बोललो. तिने त्याच्यावर मानसिक उपचार सुरू असल्याचे सांगितले. त्यावर आपण डॉक्टरांशीही बोलल्यानंतर तो त्यांचा पेशंट असल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही खबरदारी घ्यावी.’
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.