आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज 10 दिवसांच्या लाडक्या बाप्पाला निरोप:ढोल-ताशांच्या गजरात निघाली बाप्पाची मिरवणूक; बाप्पावर फुल अन् गुलालची उधळण

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज दहा दिवसांचा पाहूणचार घेऊन बाप्पा निरोप घेणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या नामगजरात आज बाप्पाचे विसर्जन शुक्रवारी (09 सप्टेंबर) केले जाणार आहे. गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हला, अशी काहीशी अवस्था हा दिवस मनोभावे सेवा केलेल्या भक्तांची झाली आहे.दोन वर्षांच्या निर्बंधमुक्ती नंतर प्रथमच बाप्पांची अशा पद्धतीने धुमधडाक्यात व जल्लोषात मिरवणूक निघाली आहे.

पोलिसांचा असणार तैनात बंदोबस्त

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळ्या सणांवर सावट होते. यंदा संपुर्ण निर्बंध शिथिल झाले असून, शुक्रवारी सकाळी गणेश विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ झाला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात असणार आहे.

या मार्गाने जात आहे मिरवणूक

जयहिंद चौकापासून सुरू झालेली मिरवूक वीर हनुमान चौक, जनता बॅक,टिळक रोड, अकोट स्टॅँड, सुभाष चौक, तेलीपुरा चौक, मो. अली चौक (ताजनापेठ पोलिस चौकी), गांधी चौकातून मार्गक्रमण करत गणेश घाट येथे समारोप होईल.

अशी झाली सुरूवात

मिरवणुकीला जयहिंद चौकात मानाच्या बाराभाई गणपती पूजनानंतर झाला. श्री राजराजेश्वर गणेशोत्सव मंडळ, श्री जागेश्वर गणेशोत्सव मंडळ व श्री खोलेश्वर गणेशोत्सव मंडळ या चार मानाच्या गणेशोत्सव मंडळानंतर प्रथम येणाऱ्या मंडळाला क्रमांक देण्यात आले. मिरवणुकीच्या सुयोग्य संचालनासाठी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यरत आहे. हे क्रमांक याच मंडळांतर्फे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांना वितरीत करण्यात आले. मानाच्या मंडळांचे पूजन लोकप्रतिनिधी,विविध सरकारी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी व श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.

घरगुती बाप्पांनाही निरोप

घरोघरी विराजमान गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात येत आहे. भक्तांनी आपापल्या सोयीने लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले. अनेक घरी स्थापना धार्मिक विधीनंतर विसर्जन करण्यात आले. 11 ठिकाणी कृत्रिम टाक्यांची व्यवस्था करण्यात आली. यात मोर्णा नदी, तापडीया नगर, कौलखेड , जवार हजर नगर, मोठी उमरीसह अन्य ठिकाणांचा समावेश आहे.

अशीही सज्जता

गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. गांधीग्राम येथे बोट व साहित्यासह शोध व बचाव पथक सज्ज ठेवण्यात येणार आहे. बाळापूर तालुक्यातील भिकुंड बंधारा येथे मोठया प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन होते. त्यानुसार या ठिकाणीही शोध व बचाव पथक सज्ज ठेवण्यात येत आहे. मोर्णा नदी क्षेत्रात गणेश घाटाच्या ठिकाणी अग्निशमन विभागाची पथके सज्ज आहेत.

बातम्या आणखी आहेत...