आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाचा कहर:सतर्कता बाळगा सतत 37 अंशांवरचे तापमान ठरू शकते घातक; | marathi news

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतरच जिल्ह्यात प्रखर उन्हाचे चटके सोसवेनासे झाले आहेत. त्यात एप्रिल महिन्यात पुन्हा तापमनाचा भडका उडणार असल्याने अकोलेकरांना प्रखर उन्हाचे चटके सोसावे लागणार आहेत. प्रादेशिक हवामान विभाग नागपूरकडून प्राप्त माहितीनुसार गेल्या दहा वर्षांतील एप्रिल महिना हा वाढत्या तापमानामुळे अकोलेकरांसाठी सर्वाधिक घातक ठरला आहे.

दरवर्षीच्या उन्हाळ्यात जागतिक पातळीवरील कमाल तापमानाच्या विक्रमी आकड्यांमध्ये अकोल्याचा समावेश असतो. यंदाही मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतरच जिल्ह्यात उन्हाचे चटके असह्य होऊ लागले आहेत. वाढत्या तापमानामुळे जनजीवन प्रभावित होत आहे. यंदाच्या मार्च महिन्यात ३६ अंश सेल्सियसपासून जिल्ह्यातील कमाल तापमानात सुरूवात झाली होती. मार्च अखेरपर्यंत पारा ४३ अंशांवर पोहोचला.

एप्रिल महिन्याची सुरुवातही ४३ अंशांपासून झाली आहे. गेल्या दहा वर्षांतील आकडेवारीचा विचार करता अकोला जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. २९ एप्रिल २०१९ ला जिल्ह्यात ४७.२ अंश एवढे सर्वाधिक तापमान होते. त्यामुळे हा एप्रिलही तापमानाच्या दृष्टीने अकोलेकरांसाठी तापदायक ठरू शकतो. १९०५ मध्ये किमान पारा सर्वात कमी : आतापर्यंतचा सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पाहता १९०५ मध्ये ती झाली होती. १ एप्रिल १९०५ अकोला जिल्ह्यात किमान तापमान ११.१ डिग्री सेल्सियस होते.

तापमानाचे चिंताजनक आकडे
प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार अकोल्यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होते. विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कमाल तापमानाचे विक्रमी आकडे चिंताजनक होत आहेत. प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लानेट सोसायटी, चंद्रपूर.

३८ अंशांपुढे दिसतात परिणाम
साधारणपणे ३८ अंश सेल्सियसपेक्षा अधिकचे तापमान सतत राहिल्यास मानवी आरोग्यासाठी ते धोक्याचे मानले जाते. हे तापमान एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शरीर सहन करते. त्यानंतर त्याचे आरोग्यावर परिणाम दिसू लागतात. डॉ. अनुप चौधरी, वैद्यकीय तज्ज्ञ

दहा वर्षांत एप्रिल महिन्यात नोंदवले गेलेले सर्वाधिक तापमान
एरवी वाहनचालकांची वर्दळ असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील रस्ताही कडक उन्हामुळे निर्मनुष्य झाला आहे.

गेल्या १० वर्षांमध्ये २९ आणि ३० तारखांनाच तापमानात वाढ
१ एप्रिल १९०५ अकोला जिल्ह्यात किमान तापमान ११.१ डिग्री सेल्सियस होते.

बातम्या आणखी आहेत...