आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:आरोग्य िदनानिमित्ताने सुंदर‎ माझा दवाखाना उपक्रम‎

अकाेला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक आरोग्य दिनानिमित्त सुंदर‎ माझा दवाखाना राबवून िदन साजरा‎ करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य‎ अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांचे‎ मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशिक्षण‎ केंद्र येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी‎ कार्यशाळेचे आयोजन करण्यात‎ आले होते. या कार्यशाळेत सहभागी‎ अधिकाऱ्यांना सुंदर माझा दवाखाना‎ उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात‎ आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा‎ सर्वेक्षण अधिकारी डॉ विजय‎ जाधव यांनी यांनी थीमबाबत‎ मािहती िदली. सरकारी रुग्णालये‎ आणि आरोग्य संस्थेत सर्वांना‎ समान आरोग्य सुविधा उपलब्ध‎ असून, लोकांनी सार्वजनिक‎ रुग्णालयांच्या सुविधांचा वापर केला‎ पाहिजे, असे ते म्हणले.

या‎ कार्यशाळेला डॉ भावना मेश्राम,‎ तालुका आरोग्य अधिकारी डॉ.‎ कराळे,तालुका आरोग्य अधिकारी‎ डॉ. चव्हाण, तालुका आरोग्य‎ अधिकारी डॉ. बनसोड, जिल्हा‎ साथरोग अधिकारी डॉ. जावेद‎ खान, सर्व प्राथमिक आराेग्य केंद्राचे‎ प्रथम वैद्यकीय अधिकारी , प्रसिद्धी‎ शाखेचे विस्तार अधिकारी,‎ अविनाश बेलोकर, प्रशांत गुल्हाने,‎ जिल्हास्तरीय पर्यवेक्षक अनुप‎ तायडे, प्रविण देशमुख, आकाश‎ वाघ, हिरास, किर्डे, बोरचाटे, आशा‎ कार्यक्रमाचे सचिन उनवणे उपस्थित‎ होते.‎