आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पावसाळ्यात वीज यंत्रांपासून सावध राहा ; वीज दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणचे आवाहन

अकोला20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा सुरु होताच वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडून वीज प्रवाह खंडित होणे, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज वाहिन्यांत घर्षण होऊन ठिणग्या उडणे, असे प्रकार घडतात. सोबतच घरगुती वीज उपकरणे,वीज यंत्रणेपासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी सावधगिरी बाळगली तर होणारे वीज अपघात टाळता येणे शक्य आहे. अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, खांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स, घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटनेची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने कधीकधी वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास वीज ग्राहकांनी जवळच्या महावितरण कार्यालयास अवगत करावे, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

या क्रमांकावर करा संपर्क शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरु असणाऱ्या कॉलसेंटर्सचे १९१२,१८१८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे दोन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...