आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानयज्ञ:संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त खडकी‎ बुद्रूक येथे आजपासून भागवत कथा सप्ताह‎

अकोला‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडकी बुद्रूक येथील श्री विठ्ठल रुखुमाई‎ मंदिरामध्ये साेमवार ६ ते साेमवार १३‎ फेब्रुवारी दरम्यान श्रीसंत गजानन महाराज‎ प्रगट दिनानिमित्त संगीत भागवत कथा‎ ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे.‎ सप्ताहाचे मार्गदर्शक नंदू महाराज इंगळे‎ (चांदूर) तर प्रवचनकार बळीराम‎ महाराज दोड (शिवार) हे करणार‎ आहेत.‎ या सप्ताहात सकाळी ५ ते ६ काकडा,‎ सकाळी ९.३० वाजता ते १२ वाजता‎ श्रीमद् भागवत प्रवचन हाेणार आहे.‎ दुपारी तीन ते पाच श्रीमद् भागवत प्रवचन,‎ सायंकाळी ६ ते ७ श्रीहरिपाठ, रात्री ७ ते‎ १० वाजता हरिकीर्तन हाेणार आहे.‎ कार्यक्रमाचे नेतृत्व संजय महाराज कुटे‎ हे करणार आहेत.

रोज संध्याकाळी ७ ते‎ १०पर्यंत कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित‎ केले आहे. यात निवृत्ती महाराज फाळके‎ शेगाव , हभप बळीराम महाराज दोड ,‎ हभप संजय महाराज कुटे, हभप श्रीकृष्ण‎ महाराज कवळकर , नंदू महाराज इंगळे,‎ महेश महाराज मारवाडी, श्रीधर महाराज‎ आवारे, काल्याचे कीर्तन श्रीधर महाराज‎ आवारे आदी कीर्तनकारांचे कीर्तन‎ आयोजित करण्यात आले आहे. साेमवार‎ १३ फेब्रुवारीला दुपारी एक ते तीन‎ महाप्रसादाचे आयोजन केले आहे.‎ रविवारी १२ फेब्रुवारीला पालखी‎ सोहळ्याचे आयोजन हाेणार आहे. दुपारी‎ एक वाजता ग्राम प्रदक्षिणा करून विठ्ठल‎ रुखमाई मंदिर येथे या पालखी‎ सोहळ्याचा समारोप होणार आहे.‎

या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी‎ सप्तशृंगी मंडळ, क्रांती गणेश मंडळ, वीर‎ भगतसिंग मंडळ, गणेश घाट स्वच्छता‎ मंडळ, ब्रह्मा तरुण मंडळ, नगरवासी‎ खडकी बुद्रूक जि.प. नगर,श्रद्धा नगर,‎ साने गुरुजी नगर, अष्टविनायक नगर‎ ,सूर्या कॉलनी, महसूल कॉलनी, म्हाडा‎ कॉलनी , शिक्षक कॉलनी ,कोठारी‎ वाटिका , संतोष नगर ,संतनगर ,साईनाथ‎ कॉलनी आदी कॉलनीचे भक्तगण,‎ नागरिक परिश्रम घेत आहेत, असे‎ गजानन हरणे यांनी पत्रकाद्वारे कळवले‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...