आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:भक्तीधाम मंदिर व उपजिल्हा‎ रुग्णालयात स्वच्छता अभियान‎

मूर्तीजापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैराग्यमूर्ती संत श्री गाडगेबाबा यांची कर्मभूमी‎ असलेल्या मूर्तीजापूर शहरात म्ूर्तिजापूर‎ स्वच्छता अभियान, पटवारी कॉलनी आणि‎ उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने रुग्णालय‎ परिसर तसेच भक्ती धाम परिसरात स्वच्छता‎ अभियान राबविण्यात आले.‎ रुग्णालय परिसर व भक्तीधाम मंदिर‎ परिसरात स्वच्छता अभियान राबवून सर्व‎ परिसर स्वच्छ करण्यात आला.

झाडे-झुडपी,‎ प्लास्टिक आदीं साफ करण्यात आले.‎ याप्रसंगी स्वच्छता अभियानाचे ज्येष्ठ‎ मार्गदर्शक प्राचार्य सत्यनारायण तिवारी,‎ रामकृष्ण गावंडे, माजी प्राचार्य सत्यनारायण‎ तिवारी सर,माजी जि.प,.मुख्याध्यापक‎ अविनाश बांबलर, दिनेश श्रीवास, विलास‎ नसले, विनोद देवके, रावसाहेब अभ्यंकर,‎ गुड्डू घुले,श्री. कवटकर, छोटू कडू, नयन‎ पांडे, ओमांश कडू,सोहंम सरोदे, श्रेयश‎ शिंगणे,कु,चैतन्या पवार, समर्थ आदी‎ उपस्थित होते.‎ भक्तीधाम मंदिर परिसरात स्वच्छता‎ अभियान राबविण्यात आल्याने या भागातील‎ रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. म्ूर्तिजापूर‎ स्वच्छता अभियानाच्या वतीने सुरू‎ असलेल्या या अभियानामध्ये मोठ्या‎ प्रमाणात सामाजिक कार्यात रुची असलेल्या‎ युवकांनी, सामाजिक कार्यकर्ते,युवती,तसे च‎ सेवानिवृत्त मंडळी, महाविद्यालयीन‎ विद्यार्थी,शहरवासी आदींनी सहभागी व्हावे,‎ असे आवाहन करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...