आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार परिषद:‘भारत जोडो यात्रे’चे 16 नाेव्हेंबरला आगमन; जिल्ह्यात ४५ कि.मी.प्रवास

अकाेला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जाेडाे यात्रेचे १६ नाेव्हेंबर राेजी जिल्ह्यात आगमन हाेणार असून, यात्रा जिल्ह्यातून ४५ कि.मी.चा प्रवास करणार आहे. यात्रेदरम्यान, खा. गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थी, कामगारांसह १६ संघटनांचे प्रस्ताव आले, अशी माहिती बुधवारी कॉग्रेसतर्फे आयाेजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

लोकशाहीच्या रक्षणासाठी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी केले. पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री प्रा. अजहर हुसेन व माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी संबाेधित केले. यात्रेचे समन्वयक प्रशांत गावंडे, युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ढाेके यांनीही माहिती दिली. देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी, व्यापारी, शेतमजुरांसमोर प्रचंड आव्हाने असताना पंतप्रधान मात्र उद्योगपती मित्रांच्या हितासाठी काम करत आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. सध्या नागरिक अस्वस्थ असून, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राहुल गांधी यांची ३५०० कि.मी.ची भारत जोडो पदयात्रा देशभर सुरू आहे. ही यात्रा इतिहास घडवेल, असा विश्वास प्रा. हुसेन यांनी व्यक्त केला. भारत एकसंघपणे पुन्हा जोडल्या जावा, हा देश अखंड राहावा असे वाटणाऱ्या प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहनही काँग्रेस नेत्यांनी केले.

असा राहणार यात्रेचा मार्ग भारत जाेडाे यात्रा महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर रोजी दाखल हाेत असून १६ नाेव्हेंबर राेजी रात्री पातूर तालुक्यात येणार आहे. १७ नाेव्हेंबर राेजी सकाळी पातूर येथील शाह बाबू हायस्कूल येथून यात्रा बाळापूरकडे रवाना हाेईल. दुपारी ३.३० वाजता हिंगणा उजाडे व त्यानंतर बटवाडी फाटा येथे मुक्काम राहणार आहे. १८ नाेव्हेंबर राेजी सकाळी यात्रा कुपटा येथील जि.प. शाळेतून बुलडाणा जिल्ह्यात रवाना हाेणार आहे. शेगाव येथे खा. राहुल गांधी यांची सभा हाेणार असून, सभेला हजर राहण्याचे आवाहन कांॅग्रेस नेत्यांनी केले.

समविचारींनी सहभागी व्हावे भारत जाेडाे यात्रेत सर्वच समविचारींना सहभागी हाेणे आवश्यक असल्याचे काँग्रेस नेते म्हणाले. खा. राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी ईपीएस ९५ पेन्शनधारक समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विद्याथी संघटना, एकल महिला संघटना, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांसह अन्य संघटनांचे प्रस्ताव आलेले आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती व संघटनांचाही प्रस्ताव येत आहेत. यात्रेत मेधा पाटकर यांच्या टिममधून ५०० महिला यात्रेत सहभागी हाेणार आहेत, अशी माहिती यात्रेचे समन्वयक प्रशांत गावंडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...